देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्वाचं; उदय सामंतांना एकनाथ शिंदेंचं नाव टाळलं; तरीही म्हणतात सरकार शिवसेना-भाजपचच

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) कधी होणार असा सवाल गेल्या चाळीस दिवसांपासून विरोधी पक्षाकडून विचारणा करण्यात येत होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता काही मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजूनही खातेवाटप करण्यात आले नाही. खातेवाटप झाले नसून सध्या […]

देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्वाचं; उदय सामंतांना एकनाथ शिंदेंचं नाव टाळलं; तरीही म्हणतात सरकार शिवसेना-भाजपचच
मंत्री उदय सामंत
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 2:48 PM

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Cabinet) कधी होणार असा सवाल गेल्या चाळीस दिवसांपासून विरोधी पक्षाकडून विचारणा करण्यात येत होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता काही मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी अजूनही खातेवाटप करण्यात आले नाही. खातेवाटप झाले नसून सध्या राज्यात मुसळधार पाऊस असल्याने आणि राज्यातील नागरिक संकटात असूनही खातेवाटपाचा प्रश्न उपस्थित केला गेल्याने मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद घेऊन आम्ही काम करत असून या मंत्रिमंडळाचे लवकरचं खातेवाटप होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant)यांनी बोलताना सांगितले की, कोण काय म्हणते यापेक्षा आम्हाला सध्या देवेंद्र फडणवीस काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्वाचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात पावसाचे थैमान

सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे, त्यामुळे विरोधकांकडून मंत्रिमंडळाचे खातेवाटप कधी होणार आणि नागरिकांच्या संकटकाळात मंत्री कधी उभा राहणार असा सवाल उपस्थित केला गेल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी आमच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच खातेवाटप होणार असल्याचे त्यांना स्पष्ट केले.

आशिर्वाद बाळासाहेबांचा

शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर आता खातेवाटप कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या राज्यात पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे विरोधकांकडून पुरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच सरकारच्या कामावर सवाल उपस्थित केले गेले आहेत. त्याविषयी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, शिंंदे-फडणवीस सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे आहे. आणि त्यांच्या विचार घेऊनच आम्ही वाटचाल करत असून त्यांचे आशिर्वाद घेऊन आम्ही लवकरच कामाला सुरूवात करणार आहोत असंही उदय सामंत यांनी सांगितले.

लवकरच खातेवाटप

शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांना तब्बल 40 दिवसानंतर शपथ देण्यात आली, त्याआधीपासून विरोधी पक्षाकडून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. जिल्ह्यात पूरमय स्थिती असतानाही खातेवाटप झाले नसल्याने नागरिक मदत मिळणे अवघड झाले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी आता खातेवाटप कधी होणार असा सवाल उपस्थित केला गेल्यानेच मंत्री उदय सामंत यांनी या सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच खातेवाटप कार्यक्रम जाहीर होईल असंही त्यांनी सांगितले.

देवेंद्रजी काय म्हणचतात महत्वाचं

सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीविषयी बोलताना उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता आणि शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे असूनही त्यांनी त्यांचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांनी सांगितले की, कोण काय म्हणतात ते महत्वाचे नाही तर देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी काय म्हणतात ते महत्वाचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. बिहारच्या राजकारणाविषयी बोलताना ते म्हणाले की, बिहारला कोण काय बोलले ते मला माहीत नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पक्षाबाबतचा वाद न्यायालयात

यासरकारवर आणि पक्षाबाबतचा वाद न्यायालयात असतानाच त्याविषयी बोलताना त्यांना सांगितले की, सध्या राज्यात सेना-भाजपचे सरकार आहे, आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यातील कामकाज सुरळीत चालवत असून राज्यातील कोणतेही कामे थांबलेले नाही, या परिस्थितीत मुख्यमंत्री निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.