प्रवाशांचे खिसेच नव्हे तर कपडेही फाडते महागडी एसी लोकल !
मध्य रेल्वेवर 56 तर पश्चिम रेल्वेवर 79 एसी लोकल धावत आहेत. या एसी लोकलच्या सिंगल जर्नी प्रवासाच्या तिकीट दरात 5 ऑगस्टपासून पन्नास टक्के कपात केल्यानंतर एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यात सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या पिकअवरला असलेल्या फेऱ्यांना जादा प्रतिसाद मिळत आहे.
मुंबई : मुंबईच्या एसी लोकलचे (Ac local ) महागडे भाडे आणि त्या तुलनेत मिळत असलेली सेवा याची काही सांगडच लागत नाही. या एसी लोकलमध्ये केवळ वातानुकूलित यंत्रणेशिवाय (air conditioning ) एकही अतिरिक्त सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरविलेली नाही. आता एसी लोकलच्या आसनांमुळे प्रवाशांच्या महागड्या ट्राऊजर्स ( Trouser ) फाटल्या जात असल्याची तक्रारी येत आहेत. एका प्रवाशाने या दोषपूर्ण आसनांचा व्हीडीओच ट्वीटरवर शेअर करीत आपली फाटलेली ट्राऊजर रेल्वे भरून देणार काय असा सवाल केला आहे.
रेल्वे बोर्डाने ही लक्झरीयस सेवा असल्याने तिचे भाडे फर्स्टक्लासच्या तिकीटाच्या 1.2 पट ठेवले आहे. वास्तविक फर्स्टक्लासच्या डब्यात निदान गादीची मऊ आसने तरी आहेत. परंतू या एसी लोकलना स्टेनलेस स्टीलची आसने बसविण्यात आली आहेत. त्यामुळे एसी लोकलमध्ये एअरकंडीशन यंत्रणेशिवाय एकही लक्झरी सुविधा नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. हिवाळ्यात या स्टेनलेस स्टीलच्या आसनांमुळे आणखीनच थंडावा निर्माण होत त्याचा त्रासच होत असतो.
@drmbct @WesternRly @RailMinIndia See AC Local seat not filled properly. My Raymond trouser got damage while sitting on this faulty seat in Coach no.7019-C. Who will be responsible for this faulty seat not filled properly. Pls reply. Rajiv Singal 9821012287 pic.twitter.com/eqpII7tYn1
— Rajiv Singal (@singalrajiv) December 20, 2022
जागरूक आणि दक्ष प्रवासी राजीव सिंघल यांना आज पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून प्रवास करताना विचित्र अनुभव आला. तो त्यांनी ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. ते कोच क्र. 7019 – C मधून प्रवास करताना त्यांची महागडी रेमण्ड कंपनीची ट्राऊजर्स या स्टीलच्या आसनांच्या फटीत अडकून पाठच्या बाजूस फाटली. त्यामुळे त्यांना प्रवास करताना लाजिरवाणे वाटले. त्यांनी या आसनाला एका बाजूला वेल्डींगच न केल्याचे निदर्शनास आणले आहे. त्यांनी यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे कारशेड इनचार्ज यांना यासंदर्भात खडसावले. तसेच ट्वीटरवरही तक्रार करीत ही फॉल्टी सिट बदलण्याची किंवा दुरूस्त करण्याची मागणीही पश्चिम रेल्वे प्रशासनाला केली आहे.