मुंबईजवळ गोराईत रस्त्यावर स्फोटकं आढळल्याने खळबळ
मुंबई: मुंबई उपनगरातील गोराई इथं बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. सकाळी साडेआठच्या सुमारास गोराई डम्पिंग ग्राऊंडजवळ रस्त्यावर बॉम्बसदृश्य स्फोटक सापडल्याने, खळबळ उडाली. आज सकाळी गोराईतील कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरुन मुलांना घेणअयासाठी निघाली होती. त्यावेळी बसमधील शिपाई तृप्ती शाह यांच्या नजरेस रस्त्यावरील काहीतरी संशयित दिसलं. त्यांनी निरखून पाहून उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिलं. शाळा व्यवस्थापकांना […]
मुंबई: मुंबई उपनगरातील गोराई इथं बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. सकाळी साडेआठच्या सुमारास गोराई डम्पिंग ग्राऊंडजवळ रस्त्यावर बॉम्बसदृश्य स्फोटक सापडल्याने, खळबळ उडाली.
आज सकाळी गोराईतील कृष्णा मेनन अकादमी ज्युनियर कॉलेजची बस गोराईवरुन मुलांना घेणअयासाठी निघाली होती. त्यावेळी बसमधील शिपाई तृप्ती शाह यांच्या नजरेस रस्त्यावरील काहीतरी संशयित दिसलं. त्यांनी निरखून पाहून उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिलं. शाळा व्यवस्थापकांना फोन करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली. शाळेने पोलीस कंट्रोल रुमला ही माहिती कळवली.
त्यानंतर बोरिवली पोलिसांनी तातडीने बॉम्ब स्क्वॉड पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बॉम्बसदृश्य स्फोटक ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.
काही दिवसापूर्वी पनवेलजवळ वस्तीच्या एसटी बसमध्ये स्फोटक आढळल्याने रायगड जिल्हा हायअलर्टवर होता. त्यानंतर आता गोराईतही स्फोटकं आढळल्याने भीतीचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या