मुंबईत नोटांचा कारखाना; पोलीस म्हणतात किती कोटी छापलेत काय माहित…

मुंबईत काय नाही असं नाही, आता एकट्याने पैसे छापायचा कारखानाच काढला होता. मात्र पोलिसांनी धाड टाकून ताब्यात घेतल्यानंतर आता त्याचे कारनामे बघून पोलीसच चक्रावले आहेत...

मुंबईत नोटांचा कारखाना; पोलीस म्हणतात किती कोटी छापलेत काय माहित...
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 5:14 PM

मुंबईः मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये बनावट नोटा (fake currency) छापल्या जात असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी मिळाली होती. झोपडपट्टीमध्ये (Slam Area) असलेल्या एका खोलीमध्ये 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जात होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच संबंधित घरावर छापा टाकला असता नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 7 लाख 16 हजार 150 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या आहेत. याप्रकरणी आरोपी रोहित शहाला अटक करुन पुढील तपास चालू करण्यात आला आहे.

बनवाट नोटा छापल्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे वय 22 वर्षे असून याप्रकरणी आणखी कोणी त्यामध्ये सामील आहे का याचाही शोध घेतला जात आहे.

तो एका खासगी कंपनीत सेल्समन म्हणून काम करत आहे. पण हे काम लोकांना दाखवण्यासाठी तो करत होता. मात्र त्याचे मुख्य काम हे बनावट नोटा छापून बाजारात त्या खपवण्याचा प्रयत्नही तो करत होता.

बनावट नोटा छापल्या प्रकरणातील आरोपी रोहित मनोज शहा हा मुंबईतील कांदिवली भागातील रहिवासी आहे. त्याने मानखुर्दमध्येच बनावट नोटा छापण्यासाठी सर्व सेटअप तयार केला होता. त्याद्वारेच तो बनावट नोट छापत होता. त्यामुळे याता त्याला आयपीसीच्या कलमांखाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

मानखुर्दमध्ये बनावट नोटा छापल्याचे प्रकरण पोलिसांना समजताच शहाच्या घरावर धाड टाकली गेली. त्यानंतर 200, 100 आणि 50 च्या नोटांची छपाई केली असल्याचे पोलिसांना समजले.

या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की,100, 200 आणि 50 रुपयांच्या बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली होती. मात्र आता त्या खोलीतून अधिक नोटा जप्त केल्या असून त्या किती छापल्या आहेत, त्याचा तपास सुरु करण्यात आला आहे.

मानखुर्दमध्ये पोलिसांनी छापा टाकल्यानंतर नोटांचा मोठा साठा जप्त केला गेला आहे. या छाप्यात पोलिसांना 7 लाख 16 हजार 150 रुपयांच्या बनावट नोटा ताब्यात घेतल्या आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी शहाच्या खोलीतून बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेला लॅपटॉप आणि प्रिंटरही ताब्यात घेतला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.