राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा 23 जानेवारीपासून एल्गार, आंदोलनाची रुपरेषा ठरली
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल. (Farmer Protest for Four Days In Mumbai)
मुंबई : गेल्या 50 दिवसांपासून दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या शेतकरी कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी येत्या 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात एल्गार पुकारण्यात येणार आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येईल. (Farmer Protest for Four Days In Mumbai)
या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी कामगार मुंबईत चार दिवस ठिय्या आंदोलन करणार आहे. येत्या 23 जानेवारी ते 26 जानेवारी असे चार दिवस हे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने (महाराष्ट्र) मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद याबाबतची माहिती दिली.
या आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलनांची संघर्ष समिती, नेशन फॉर फार्मर्स आणि हम भारत के लोग या राज्यातील पाच संघटना करणार आहेत.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी सर्व राज्यांच्या राजधानीत आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तसेच येत्या 18 जानेवारीला ‘किसान महिला दिवस’ देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे.
आंदोलनाची रुपरेषा
23 जानेवारी – राज्यातून मुंबईच्या दिशेने वाहन मार्च 24 जानेवारी – मुंबईत महामुक्काम आंदोलन! 25 जानेवारी – चलो राजभवन! 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय ध्वजाचे वंदन
(Farmer Protest for Four Days In Mumbai)
संबंधित बातम्या :
Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता पुन्हा सुरु, किती टक्के वाढ?