Farmer Protest in Mumbai | मुंबईच्या आझाद मैदानात जमलेल्या शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घ्यावेत आणि हमीभावाचा कायदा लागू करावा, या मागणीचे निवदेन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आहे. (Farmers Protest in Mumbai)
मुंबई : देशाच्या राजधानीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील शेतकरी मुंबईत (Farmer protest in Mumbai )पोहोचले आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती (महाराष्ट्र), कामगार संघटना संयुक्त कृती समिती (महाराष्ट्र), जन आंदोलनांची संघर्ष समिती (महाराष्ट्र), नेशन फॉर फार्मर्स (महाराष्ट्र) आणि हम भारत के लोग (महाराष्ट्र) या पाच मंचांनी मिळून संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा तयार केला आहे. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीनं आझाद मैदानात सभेचे आयोजन करण्यात आलेय.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आझाद मैदानात उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या आंदोलाना पाठिंबा देतील. आझाद मैदानामध्ये जमलेल्या शेतकऱ्यांची प्रमुख मागणी केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, ही आहे. (Farmers protest in Mumbai today demanded farm laws cancelled)
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? (Major Demands of Farmer Protest in Mumbai)
- कंत्राटी कामगार प्रथा तसेच शेतकरी कामगार विरोधी कायदे रद्द करणे.
- शेतकरी विरोधी केलेले तीन काळे कायदे रद्द करा.
- देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनी खालसा करुन 7/12 वरिल नावं पूर्ववत करा.
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा.
- शेतमाला भाव देण्यासाठी हमी भाव कायदा करा.
- शेतकरी विरोधी वीज बिलाचा कायदा मागे घ्या.
- शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा.
संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या आंदोलनात आज काय?
मुंबईतील आझाद मैदान येथे आज (25 जानेवारी) सकाळी 11 वाजता सभा होईल. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, डावे व लोकशाही पक्ष यांच्या प्रमुख नेत्यांसोबत अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस आणि दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करतील. सभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.
महामुक्काम आंदोलनाची सांगता
26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल. या वाहन मोर्चाच्या आयोजनात डॉ. अशोक ढवळे, जे.पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, सुनील मालुसरे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी नाही, राजभवनावर जायचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना रोखू : विश्वास नांगरे पाटीलhttps://t.co/ZcpmUKML7L#vishwasnangarepatil #FarmersProtests #Mumbai #farmersrprotest @MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संबंधित बातम्या :
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!
(Farmers protest in Mumbai today demanded farm laws cancelled)