CM Eknath Shinde: शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार; कृषी दिनानिमित्त नवमुख्यमंत्र्यांचे अश्वासन; एकनाथ शिंदेंनी सांगितले राज्य सरकारचे संकल्प

सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी हे सरकार कशा पद्धतीने कटीबद्ध असणार आहे, त्याविषयी त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde: शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार; कृषी दिनानिमित्त नवमुख्यमंत्र्यांचे अश्वासन; एकनाथ शिंदेंनी सांगितले राज्य सरकारचे संकल्प
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणारः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9mrathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 4:21 PM

मुंबईः राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याचा प्रयत्न करणार असून शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार असे अश्वासन देण्यात आले. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की,कृषिदिनानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांचा विकास (Farmers Development) घडवून आणणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतकऱ्यांमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या मालाला हमीभावाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि विकास प्रकल्पांना गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय

सरकार स्थापन झाल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी हे सरकार कशा पद्धतीने कटीबद्ध असणार आहे, त्याविषयी त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी या सरकारकडून खास प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून हिताचे निर्णय

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलतानाच सांगितले होते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत असल्याने बॅटींग करायला आणखी मजा येणार अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. आजही कृषिदिनानिमित्त सरकारकडून शेतकऱ्यांविषयीची भूमिका स्पष्ट करताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातीलच त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठीचे प्रयत्नही दोघांजणामंकडून राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जाती असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारचे संकल्प

शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारची भूमिका व्यक्त करताना त्यांनी सांगितले, बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची शिकवण, राज्यातील विकास प्रकल्प मार्गी लावणे, मेट्रोचे प्रकल्प, जलसंकल्पाचे प्रकल्प, जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न, प्रकल्पांना चालना देण्यासाठी गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.