फॅट टू फिट… मुंबईतील 132 किलो ‘वजनदार’ महिला कॉन्स्टेबलचा प्रवास

पोलिस कॉन्स्टेबल रुपाली कदमला हायपरटेंशन, थायरॉईड, पायात सूज होती. तिचा बॉडी मास इंडेक्सचा (BMI) लेवल 47.5 होता. मात्र डॉ. लकडावाला यांनी रुपालीचं मिशन हाती घेतलं

फॅट टू फिट... मुंबईतील 132 किलो 'वजनदार' महिला कॉन्स्टेबलचा प्रवास
Follow us
| Updated on: Jan 29, 2020 | 8:56 AM

मुंबई : मुंबई पोलिस विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेचं वजन इतकं जास्त वाढलं होतं, की तिला चालायलाही अवघड झालं. कधी ड्युटीवर जाण्यासाठी निघालं, की बघ्यांकडून हेटाळणी सुरु व्हायची. उपचारांनीही काहीच फरक पडत नव्हता. अगदी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णयही घेऊन झाला. मात्र आयुष्य संपवण्याच्या वाटेवर असतानाच तिला नवीन मार्ग सापडला आणि वजन घटवून ती पोलिस विभागात पुन्हा आत्मविश्वासाने नोकरी करु लागली. फॅट टू फिट असा हा वजनदार प्रवास आहे रुपाली कदम यांचा (Fat to Fit Lady Police Constable).

पोलिस म्हटलं की सदैव ड्युटीवर सतर्क राहणं, धावपळ आलीच. कधी कुठे काय घडेल, याचा नेम नाही. बंदोबस्त असो किंवा गुन्हेगारांचा पाठलाग. चपळाई आणि तत्परता हा पोलिसांच्या कामाचा भाग आहे. मात्र दहिसरची रहिवासी असलेली रुपाली कदम काही दिवसांपूर्वी याला अपवाद ठरत होती.

वाहतूक पोलिसात असताना रुपालीचं वजन 132 किलोपेक्षा जास्त झालं होतं. 30 वर्षांपासून ती हा त्रास सहन करत होती. वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर उभं राहिलं, की लोकांचे टोमणे नेहमीचे. आयुष्याला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा मार्ग जवळपास निश्चित केला होता, मात्र तेवढ्यात दिसलेला आशेचा किरण तिच्या जीवनाला कलाटणी देऊन गेला.

रुपाली कदमची भेट नागपाडा पोलिस ओपीडीमध्ये डॉ. मुज्जफल लकडावाला यांच्याशी झाली. त्यावेळी तिला हायपरटेंशन, थायरॉईड, पायात सूज होती. बॉडी मास इंडेक्सचा (BMI) लेवल 47.5 होता. डॉक्टरांनी तिला बॅरिएट्रीक सर्जरी करण्याचा सल्ला दिला, पण तिच्यासमोर आर्थिक अडचण होती.

रुपालीच्या अडचणीवर काही दिवसातच तोडगा निघाला. डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयातर्फे तिला मदत करण्यात आली. तिच्यावर बँडेड एक्सएनवाय गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्यात आली. काही महिन्यांनंतर ती पुन्हा ड्युटीवर रुजू झाली. तेव्हा तिच्या सहकाऱ्यांना आणि नेहमी तिची हेटाळणी करणाऱ्यांना तोंडात बोटं घालण्यावाचून पर्याय नव्हता. सध्या रुपाली एमएचबी पोलिस ठाण्यात कार्यरत (Fat to Fit Lady Police Constable) आहे.

मुंबई पोलिस दलाची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. पोलिस दलात कोणीही अनफिट राहू नये, म्हणून नागपाड्यामधील पोलिस रुग्णालयात डॉ. मुजफ्फल लकडावाला सर्वांची नियमित तपासणी करतात. डॉक्टरांनी अनेक पोलिसांची लठ्ठपणाच्या आजारातून सुटका केली आहे. रुपालीसारख्या अनेक उदाहरणांमुळे लठ्ठपणा जडलेल्या पोलिसांना फिटनेस राखण्याची प्रेरणा मिळत आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.