विदर्भावरून घमासान; वाकायचे तर नाही पण मोडायचे पण नाही, डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला ‘मातोश्री’वर

Udhav Thackeray- Ramesh Chennithala Visit : वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड म्हणतात ते काही उगीच नाही. वऱ्हाडीतील काही जागांवरून सध्या ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. विदर्भातील जागा वाटापवरून घमासान झाल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आता काँग्रेस हायकमांडचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

विदर्भावरून घमासान; वाकायचे तर नाही पण मोडायचे पण नाही, डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला 'मातोश्री'वर
डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेस-ठाकरे यांच्यात चर्चा
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 12:20 PM

वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड म्हणतात ते काही उगीच नाही. विदर्भातील काही जागांवरून सध्या उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कमालीचे संबंध ताणल्या गेले आहेत. काल महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीत त्याचे उग्र पडसाद दिसून आले. विदर्भातील 62 जागांपैकी जवळपास 10 जागांवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि पडदा टाकण्यासाठी आता काँग्रेस हायकमांडचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर दाखल झाले आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्याशी या प्रकरणात चर्चा करणार आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी काँग्रेसचे रमेश चेन्नीथला ‘मातोश्री’वर दाखल झाल्याची चर्चा आहे.

62 जागांपैकी इतक्या जागांचा तिढा

विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघापैकी उद्धव ठाकरे यांना 9 जागांवरून तिढा वाढल्याचे समोर येत आहे. या जागांसाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे. महाविकास आघाडीत गेल्या तीन आठवड्यात 12 मॅरेथॉन बैठकी झाल्या. त्यात विदर्भातील काही जागांवर एकमत होऊ शकले नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नागपूर भागातील काही जागा सोडण्यास तयार नसल्याचे तर त्या जागांवर उद्धव ठाकरे गटाने पण दावा सांगितल्याने वाद टोकाला गेले आहेत. नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात या मुद्दावरून खडाजंगी झाल्याचे समोर आले आहे. कालच्या बैठकीत तर हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर संजय राऊत यांनी टीकेची झोड उठवली. दिल्लीतून आता या वादावर पडदा टाकण्यासाठी हालचाल सुरू झाली आहे.

हे सुद्धा वाचा

तुटेपर्यंत ताणू नका

विदर्भातील काही जागांवरून उद्धव ठाकरे यांनी तुटेपर्यंत ताणू नका असा गर्भित इशारा दिला आहे. विदर्भात वरचष्मा कुणाचा हा प्रश्न नाही पण काही हक्काच्या जागांवर तडजोड करण्याची दोन्ही पक्षांची तयारी नसल्याचे समोर आले आहे. नाना पटोले यांनी काँग्रेस हाय कमांड महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चॅन्नीथला यांच्या दौऱ्यापूर्वी काही जागांवर आग्रही बाजू मांडली. त्यामुळे या वादावर पडदा टाकताना वाकायचे तर नाही पण महाविकास आघाडी मोडू सुद्धा द्यायची नाही असा काहीसा पवित्रा घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे. या मुद्दावर सामंजस्याने चर्चा करून मधला मार्ग काढण्याची तयारी दोन्ही गटाने दाखवली आहे.

राऊत-पटोले यांच्यात जोरदार खडाजंगी

काल झालेल्या बैठकीत  नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात जोरदार खडजंगी झाल्याचे समोर येत आहे. जागा वाटपामध्ये नाना पटोले अडसर ठरत असल्याची टीका संजय राऊत यांनी केल्याचे समजते. त्यामुळे याप्रकरणी ठाकरे गटाने काँग्रेस हायकमांडकडे तक्रारीचा सूर आळवला होता. तर आज बोलताना काँग्रेस बरोबर बोलणी पूर्णपणे थांबली असं म्हणता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. तर नाना पटोले यांनी चर्चेतून या प्रकरणी तोडगा काढण्याचे सूतोवाच केले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.