परमबीर सिंहांवर आरोप करणारे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच गुन्हा

विरारमधील इमारतीला सिडकोची बोगस बांधकाम परवानगी वापरुन, ती खरी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे. (Mayuresh Raut Param Bir Singh)

परमबीर सिंहांवर आरोप करणारे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच गुन्हा
परमबीर सिंह, मयुरेश राऊत
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 7:32 AM

नालासोपारा : विरारचे बांधकाम व्यावसायिक मयुरेश राऊत (Mayuresh Raut) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोगस सीसीच्या आधारे इमारत उभी करुन, ती ग्राहकांना विकून फसवणूक केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे. पालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी राऊतांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या सूचनेने 2017 मध्ये पोलिसांनी घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचा आरोप मयुरेश राऊत यांनी केला होता. (FIR against Virar Builder Mayuresh Raut who complained against Param Bir Singh Pradeep Sharma)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिंबरे यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार करणारे विरारचे बिल्डर मयुरेश राऊत यांच्यावरच गुन्हा दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मयुरेश राऊत अडचणीत कसे?

मयुरेश राऊत हे मेसर्स प्रतिभा एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आहेत. नालासोपारा पूर्वेकडे विजय नगर भागात प्रभाकर भुवन नावाची चार मजली इमारत आहे. तिला सिडकोची बोगस बांधकाम परवानगी वापरुन, ती खरी असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक केल्याचा राऊत यांच्यावर आरोप आहे.

बोगस सीसीच्या आधारे इमारत उभी करुन, ती ग्राहकांना विकून फसवणूक करणे, एमआरटीपी अंतर्गत फसवणूक आणि बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी नालासोपाऱ्याच्या तुलिंज पोलीस ठाण्यात मयुरेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेचे अधिकारी अक्षय मोखर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अद्याप राऊत यांना अटक करण्यात आलेली नाही.

मयुरेश राऊत यांनी काय आरोप केले होते?

मयुरेश राऊत हे वसई-विरार या परिसरात बिल्डर म्हणून व्यवसाय करतात. परमबीर सिंह यांच्यासह माजी पोलीस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा, ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे आणि इतर पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले. माझ्याविरोधात कोणतीही तक्रार नसताना मला खंडणी विरोधी पथकात तीन दिवस डांबून ठेवले आणि मारहाण केली, असा व्यावसायिक मयुरेश राऊत यांचा आरोप आहे.

“मनसुख हिरेनप्रमाणे गाड्यांचा वापर होण्याची भीती”

2017 मध्ये पोलिसांनी माझ्या घरात दरोडा टाकून दोन गाड्या चोरी केल्याचाही दावा राऊतांनी केला आहे. पोलिसांनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा वापर मनसुख हिरेन सारख्या प्रकरणात होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. न्यायासाठी पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही मयुरेश राऊत यांनी पत्र लिहिलं. तक्रारीची दखल घेऊन सध्या परमबीर सिंग यांच्या विरोधात स्टेट सीआयडी चौकशी करत आहे. त्याचप्रमाणे मयुरेश यांनी दुसरी तक्रार परमवीर सिंग आणि इतर अधिकाऱ्यांच्या मालमत्तेच्या विरोधात केली असल्याने त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो चौकशी करत आहे.

संबंधित बातम्या :

घरावर दरोडा टाकून दोन गाड्या चोरी, विरारच्या बिझनेसमनचा परमबीर सिंग, प्रदीप शर्मांवर गंभीर आरोप

घाडगे, जालान, खान ते राऊत; परमबीर सिंग यांच्यावर कोणकोणते आरोप? चौकशा किती? वाचा सविस्तर

(FIR against Virar Builder Mayuresh Raut who complained against Param Bir Singh Pradeep Sharma)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.