मुंबईत प्रभादेवीत गोदामाला भीषण आग, दोन दिवसात पाच ठिकाणी अग्नितांडव
कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती (Fire At Mumbai Prabhadevi ). त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत.
मुंबई : राज्यात आगीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कालच भांडूपच्या मॉलमध्ये भीषण आग लागली होती (Fire At Mumbai Prabhadevi ). त्यानंतर आज राज्यात तब्बल चार आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंबई, अंबरनाथ, बदलापूर आणि पुण्यात आज आगीच्या घटना घडल्या आहेत (Fire At Mumbai Prabhadevi Ambernath Badlapur And Pune Fashion Street Market).
पहिली घटना – मुंबईच्या प्रभादेवीत मोठी आग
मुंबईतील प्रभादेवीत इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनला आज भीषण आग लागली. यावेळी अग्निशमन दलाचे 16 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रभादेवीतील इलेक्ट्रिक वायरच्या गोडाऊनच्या तळ मजला आणि बेसमेंटमध्ये ही आग लागली आहे. एडीओ पवार आणि शिर्केसहीत 12 अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठी आहे. मात्र या आगीला नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत
दुसरी घटना – बदलापुरात बंद कंपनीला भीषण आग
बदलापुरात एका बंद केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.
बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत असलेल्या ईस्टर इंडिया या कंपनीला ही आग लागली आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण 9 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी 6 वाजता ही आग नियंत्रणात आली.
आग लागलेली कंपनी मागील 3 महिन्यांपासून बंद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून कंपनी मात्र संपूर्णपणे जळून खाक झालीये.
तिसरी घटना – अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन सोसायटीला आग
अंबरनाथच्या निसर्ग ग्रीन्स या उच्चभ्रू सोसायटीत बिल्डरने ठेवलेल्या बांधकाम साहित्याला शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण बांधकाम साहित्य जळून खाक झालं.
या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र यावेळी सोसायटीची अग्निरोधक यंत्रणा बंद असल्याचं अग्निशमन दलाच्या लक्षात आलं. त्यामुळे आग विझवण्यात अडथळे निर्माण झाले. अखेर एमआयडीसी अग्निशमन दलाची मदत मागवून ही आग विझवण्यात आली. या सोसायटीत १८ मजल्याच्या इमारती असून तितक्या उंच शिड्या अग्निशमन दलाकडे नसल्यानं या सोसायटीत अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र ही यंत्रणा अशा दुर्घटनांच्या वेळीच बंद असेल, तर तिचा काय उपयोग? असा सवाल यानंतर उपस्थित झालाय. दरम्यान, एकीकडे भांडुपची घटना ताजी असतानाच आता मोठ्या रहिवासी सोसायट्यांच्या फायर सेफ्टीचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. या सोसायट्यांना फायर एनओसी कुठल्या आधारावर दिली जाते? आणि अग्निरोधक यंत्रणांची तपासणी होते का? त्या यंत्रणा बंद असतील तर सोसायट्यांवर कारवाई होते का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत.
चौथी घटना – पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग
पुण्याच्या कॅम्प परिसरात असणाऱ्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण आग झाली. ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या ठिकाणी कपड्याची मोठी दुकाने आणि गोदामं असल्याने ती आग पसरली. या दुर्घटनेनंतर तात्काळ अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. फॅशन स्ट्रीटचा भाग अत्यंत अरुंद रस्त्यांचा असल्याने अग्निशमन दलाला ही आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.
सुदैवाने जीवितहानी नाही
या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, फॅशन स्ट्रीटचा परिसरात कपड्यांची अनेक दुकानं, गोदाम असल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली? किती वाजता लागली? याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Pune Fire | पुण्यातील फॅशन स्ट्रीटला लागलेली भीषण आग आटोक्यात, तब्बल 800 दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानीhttps://t.co/Yt8zCpnXvY #Pune #Punefire
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
Fire At Mumbai Prabhadevi Ambernath Badlapur And Pune Fashion Street Market
संबंधित बातम्या :