मुंबईकरांचा ‘आवाज’ खाली, मान वर, दिवाळीत ध्वनी प्रदूषण घटलं

सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे फटाके न फुटल्याने मुंबईत गेल्या 15 वर्षातील सर्वात शांत (fireworks sound pollution decrease in diwali) दिवाळी साजरी झाली आहे.

मुंबईकरांचा 'आवाज' खाली, मान वर, दिवाळीत ध्वनी प्रदूषण घटलं
fireworks
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 9:19 PM

मुंबई : सालाबादप्रमाणे यंदाही मुंबईसह राज्यात दिवाळी दणक्यात साजरी होत आहे. मात्र, यंदा कानठळ्या बसविणारे फटाके न फुटल्याने मुंबईत गेल्या 15 वर्षातील सर्वात शांत (fireworks sound pollution decrease in diwali) दिवाळी साजरी झाली आहे. ध्वनी प्रदूषणाविरोधातील मोहिमेमुळेच यंदा मुंबईत कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाचे फटाके फुटले (fireworks sound pollution decrease in diwali) नाही, असं आवाज फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु आहे. त्याला चांगलं यश मिळालं असून यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची 112.3 डेसिबल इतकी नोंद झाली. रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी असल्यानेही त्यावर परिणाम झाल्याचं सांगण्यात येतं आहे. त्याआधी 2017च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची 117.8 डेसिबल इतकी नोंद करण्यात आली होती, असं आवाज फाउंडेशनने म्हटलं आहे.

“गेल्या 15 वर्षांपासून ‘आवाज’ फाऊंडेशन दिवाळीतील प्रदूषणाची नोंद ठेवत आहे. तेव्हापासून आतापर्यंतचा अनुभव पाहता यंदाची दिवाळी अत्यंत शांत आहे, असं म्हणावे लागेल. 2010 पर्यंत दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे आवाज असायचे. या फटाक्यांचा आवाज कधी कधी तर 145 डेसिबलपर्यंत जायचा”, असं सुमैरा यांनी सांगितले. त्यात लोकांनीही आपल्या लहानग्यांना हलके फुलके फटाके घेतलेत जे आवाज करत नाहीत. त्यामुळेही या ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे.

“यंदा आवाजाची पातळी 112.3 डेसिबल इतकी आहे. सुतळी बॉम्बसारख्या कानठळ्या बसविणारे फटाके यंदा कमी झाले आहे. यंदा फुलबाजा, सुरसुरी, चक्रीचाच दिवाळीत वापर करण्यात आला. त्याबद्दल मी मुंबईकरांना खास धन्यवाद देते. माझ्यासाठी तर ही हॅपी दिवाळीच आहे, म्हणूनच मला मुंबईकरांना पुन्हा एकदा धन्यवाद द्यावेसे वाटतात”, असंही त्यांनी सांगितलं.

“दुसरीकडे फटाके विक्रेते नेहमीप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी नवीन काहीतरी घेऊन येतात, तसेच यावर्षी कमी आवाजाचे फटाके दुकानात आलेत, ध्वनी प्रदूषण हे फक्त फटाक्यांमुळे होत नसून रस्तावर चालणाऱ्या गाड्याही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करतात, हेही बरोबर असल्याचे” सुमैरा अब्दुलाली यांनी सांगितले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.