पहिली गुणवत्ता यादी 29 जूनला, मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबतचे पुढील वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने सोमवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आता महाविद्यालयातील पुढील पदवी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी (Mumbai University) सलग्नित सर्व महाविद्यालये, (College) स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन (Online) नाव नोंदणीची प्रक्रिया 9 जून 2022 पासून सुरू केली आहे. पहिली गुणवत्ता यादी 29 जूनला जाहीर होणार आहे.
या प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेबाबतचे पुढील वेळापत्रक मुंबई विद्यापीठाने सोमवारी जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार आता महाविद्यालयातील पुढील पदवी प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू असून हेल्पलाईन क्रमांकसुद्धा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
प्रथम गुणवत्ता यादी
■ 29 जून 2022 ( सकाळी 11 वाजता)
■ कागदपत्रे पडताळणी आणि ऑनलाईन शुल्क सुविधा (हमीपत्रासह)
30 जून ते 06 जुलै 2022 (3.00 वाजेपर्यंत)
द्वितीय गुणवत्ता यादी
7 जुलै, 2022 (सकाळी 11 वाजता)
■ ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि ऑनलाईन शुल्क सुविधा (हमीपत्रासह)
8 ते 13 जुलै 2022 (3 वाजेपर्यंत)
तृतीय गुणवत्ता यादी
14 जुलै 2022 (सकाळी 11 वाजता)- ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क सुविधा (हमीपत्रासह)
प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक
अर्ज विक्री (ऑनलाईन / ऑफलाईन)
9 ते 25 जून 2022 (1 वाजेपर्यंत)
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
19 ते 25 जून 2022 (2 वाजेपर्यंत) ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख
9 ते 25 जून 2022 (1 वाजेपर्यंत)
(प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन प्रवेश आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येतील.
अतिरिक्त जागांसाठी परवानगी लागणार
सद्यःस्थितीत सीबीएसई व आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्याचे बारावीचे निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. मात्र सीबीएससी आणि आयसीएसई मंडळाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयांनी आणि संस्थांनी विहित मुदतीत विद्यापीठाकडे अतिरिक्त जागांसाठी परवानगी मागून, महाविद्यालयातील गुणवत्ता यादी कट ऑफनुसार या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.