माहीम बीचवर पाच कॉलेज तरुण बुडाले, तीन जणांना वाचविण्यात यश, दोघांचा मृत्यू

होळी आणि धुळवडीचा आनंद साजरा करण्यासाठी माहीमच्या समुद्रात उतरलेले चार कॉलेज तरुण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली यातील चौघांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र एका तरुणाला शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.

माहीम बीचवर पाच कॉलेज तरुण बुडाले, तीन जणांना वाचविण्यात यश, दोघांचा मृत्यू
mumbai seaImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 25, 2024 | 9:48 PM

माहीम : होळी आणि रंगपंचमीचा सण सर्वत्र साजरा होत असताना माहीम बीचवर पाच कॉलेजचे तरुण पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने यातील चौघा तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यातील तीन तरुणांना जीवनदान मिळाले तर दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या  एका अन्य घटनेत दहीसर येथील हनुमान टेकडी परिसरात खदाणीत पोहायला गेलेल्या दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.

होळी आणि धुळवडीच्या आनंदाला मुंबईत गालबोट लागले आहे. दादर जवळील माहीम बीचवर समुद्राच्या पाण्यात खेळायला उतरलेले कॉलेजचे तरुण दुपारी चारच्या सुमारास पाण्यात उतरले. वडापाव खाल्यानंतर या तरुणांनी समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने या चार तरुण गंटागंळ्या खाऊ लागले. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तरुणांपैकी चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यातील दोघांना डॉक्टरांनी तपासून घरी सोडले. तर दोघांवर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओम लोट ( 16 ) हा दहावीचा विद्यार्थी आयसीयुत आहे, तर हर्ष किंजले ( 19 ) या 14 वीच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर यश कागडा ( 16 ) हा अकरावीचा विद्यार्थी मिसिंग असून त्याचा शोध सुरु आहे. दुपारी साडे तीन वाजता वडापाव खायाला येथे आले होते. त्यानंतर ते समुद्रात मौजमस्ती करायला उतरल्यानंतर काही वेळातच लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडाले. परंतू अग्निशमन दलामुळे पाच तरुणांपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. यश कागडा नावाचा तरुण अद्यापही बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यश मिळालेले नाही. अंधार पडल्याने आता शोध मोहीम बंद करण्यात आली आहे. मात्र उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम शुरू करण्यात येणार आहे. कोणताही सण साजरा करताना अतिउत्साह दाखवू नये जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांनी केले आहे.

दहीसरमध्ये दोघांचा मृत्यू

दहीसर येथील सुरज पटेल मार्ग, हनुमान टेकडी, अशोक वन परिसरातील जय महाराष्ट्र खदानीत दुपारी दोन जण पाण्यात उतरले होते. मनोज रामचंद्र सुर्वे ( 45 ) तसेच चिंतामणी वारंग ( 43 ) अशा दोघांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.