मुंबईकरांना मोठा दिलासा, थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ वाढवली

मुंबईत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टाँरंट आणि बार रात्री 11 वाजता बंद करावे लागतील. | Food home delivery

मुंबईकरांना मोठा दिलासा, थर्टी फर्स्टच्या रात्री ऑनलाईन फूड डिलिव्हरीची वेळ वाढवली
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 1:25 PM

मुंबई: नववर्षाच्या पूर्वसंध्येला (31st December) लोकांचा असणारा उत्साह लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 31 डिसेंबरच्या रात्री मुंबईत फूड डिलेव्हरी (Food Delivery) आणि हॉटेल्समधील पार्सलची सुविधा सुरु ठेवण्यासाठी रात्री दीडपर्यंत मुभा देण्यात आली आहे. इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनने (आहार ) यासंदर्भात पालिकेला विनंती करण्यात आली होती. पालिकेने ही विनंती मान्य केल्याने नाईट कर्फ्यूच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना काहीप्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (food home delivery time extended in Mumbai on 31st december)

बार आणि हॉटेल्स रात्री 11 वाजता बंद होणार

मुंबईत 5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टाँरंट आणि बार रात्री 11 वाजता बंद करावे लागतील. मात्र, लोकांच्या सुविधेसाठी हॉटेल्सची किचन आणि होम डिलेव्हरी रात्री दीडपर्यंत सुरु राहील.

हॉटेल व्यावसायिकांकडून पालिकेच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई महानगरपालिकेच्या या निर्णयबाद्दल ‘आहार’चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, किमान मुदतवाढ देण्याबाबत आपला मुद्दा विचारात घेतल्यानंतर आम्ही शेवटच्या क्षणी झालेल्या या घोषणेवर खुश आहोत. आम्ही आमच्या सदस्यांना रात्रीच्या कर्फ्यू दरम्यान आमच्या ऑपरेशन्सवर नियंत्रण ठेवत असलेल्या सर्व नियम आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगू. फक्त आमची विनंती आहे, की जे लोक आपले पैसे घेऊन घरी येतील त्यांना आणि होम डिलिव्हरीमध्ये सामील झालेल्या कर्मचार्‍यांना त्रास होऊ नये.

पुणेकरांनो, थर्टी फर्स्टला जेवणाची डिलिव्हरी मागवताय? निर्बंधाची नवीन वेळ

नववर्षाच्या आगमनासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना पुणेकरांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. कारण, पुणे महानगरपालिकेने 31 डिसेंबरला (31St December) खाद्यपदार्थांच्या घरपोच डिलिव्हरीवर (Food Home Delivery) निर्बंध घातले आहेत. त्यामुळे आता पुणेकरांना रात्री 11 नंतर घरगुती बेत आखूनच थर्टी फस्ट साजरा करावा लागणार आहे.

पुणे महानगरपालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रात्री 10.45 पर्यंतच खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी सुरु राहील. त्यानंतर पुणेकरांना कोणतेही खाद्यपदार्थ घरपोच मिळणार नाहीत.

संबंधित बातम्या:

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तासाला 800 भाविकांना घेता येणार सिद्धीविनायकाचे दर्शन

थर्टी फर्स्टला तळीरामांवर करडी नजर; दारू पिऊन गाडी चालवल्यास थेट रक्त तपासणी

Maharashtra Lockdown Extended | राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

(food home delivery time extended in Mumbai on 31st december)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.