पवई लेकचा दोन किलोमीटरचा परिसर आठ दिवसात चकाचक होणार, 400 विद्यार्थी लागले कामाला

"हवामान बदल" आणि "स्वच्छता" या विषयाच्या अनुषंगाने गाव, शहर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाची काळजी घेणे, घनकचरा व्यवस्थापन, झाडे लावणे, प्लॅस्टिकमुक्त भारत इत्यादींचे महत्त्व सांगणे, असे काही उपक्रम होतील. सर्व महाविद्यालयांना "ग्रीन क्लब" स्थापन करण्यास सांगितले असून वृक्षारोपण यासारखे उपक्रम आणि विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातील.

पवई लेकचा दोन किलोमीटरचा परिसर आठ दिवसात चकाचक होणार, 400 विद्यार्थी लागले कामाला
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 5:57 PM

मयुरेश गणपत्ये, मुंबई: पर्यावरण जागृतीसाठी (environmental awareness) महाराष्ट्र शासनातर्फे पहिल्यांदाच तरुणांच्या सहभागाने “पर्यावरण जागृती आणि स्वच्छता सप्ताहा”ची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Technical Education Minister Uday Samant) हे जून 7 पासून करणार आहेत. मंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 7 जून रोजी सकाळी 8 वाजता वरळी किल्ल्यावरून ही मोहीम सुरू होणार असून 13 जूनपर्यंत राज्याच्या विविध भागांमध्ये ही राबवली जाणार आहे.

आयआयटी बॉम्बेने सर्वप्रमथम या मोहीमेमध्ये सहभाग नोंदवला असून रविवारी सकाळी विद्यार्थ्यांनी पवई लेक परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे.

आयआयटी बॉम्बे अभ्युदय टीम

आयआयटी बॉम्बे अभ्युदय टीमच्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांकडून दोन किलोमीटर लांबीचा हा परिसर येत्या आठवड्यामध्ये स्वच्छ करण्यात येणार आहे. आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असून सोफिया कॉलेज फॉर वुमनही या मोहिमेत भाग घेत आहेत.

राज्यभरातील युवक सहभागी होणार

माझी वसुंधरा मोहिमेंतर्गत आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि युनिसेफ यांच्या सहकार्याने राज्यभरातील युवक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होणार आहेत. एनएसएस युनिट्सने त्यांच्या परिसरातील शैक्षणिक संस्था, किल्ले, विहिरी, नदीचे पात्र, तलाव, लेणी, ऐतिहासिक ठिकाणे, शासकीय रुग्णालये, सार्वजनिक ठिकाणे, बस डेपो, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे. तसेच पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रमही होणार आहेत.

प्लॅस्टिकमुक्त भारत

“हवामान बदल” आणि “स्वच्छता” या विषयाच्या अनुषंगाने गाव, शहर स्वच्छ ठेवणे, पर्यावरणाची काळजी घेणे, घनकचरा व्यवस्थापन, झाडे लावणे, प्लॅस्टिकमुक्त भारत इत्यादींचे महत्त्व सांगणे, असे काही उपक्रम होतील. सर्व महाविद्यालयांना “ग्रीन क्लब” स्थापन करण्यास सांगितले असून वृक्षारोपण यासारखे उपक्रम आणि विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित केले जातील.

हवामान बदलाचे परिणाम गंभीर

या उपक्रमांना प्रोत्साहन देताना, माझी वसुंधरा कार्यक्रमाचे मिशन डायरेक्टर, सुधाकर बोबडे म्हणाले, “हवामान बदलाचे परिणाम गंभीर असून महिला आणि तरुणांवर त्याचा प्रभाव जास्त आहे. या उपक्रमामुळे तरुणांना आणि मुलांना हवामान बदलाच्या परिणामांविषयी बोलण्याची, ते समजून घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची संधी मिळणार आहे.

तरुणांच्या क्षमता वाढीसाठी व्यासपीठ

हे उपक्रम माझी वसुंधरा येथील पंचमहाभूतांवर (भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश) लक्ष केंद्रित करतील आणि हवामान बदलाच्या क्षेत्रात तरुणांच्या क्षमता वाढीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतील असे सांगण्यात आले आहे.”

हवामान बदल हे बालहक्कांसाठी संकट

युसूफ कबीर वॉटर, सॅनिटेशन, हायजीन (वॉश) स्पेशलिस्ट आणि फोकल पॉइंट फॉर सीसीईएस, डीआरआर आणि इमर्जन्सी, युनिसेफ फील्ड ऑफिस फॉर महाराष्ट्र यांनी कार्यक्रमांमध्ये युवकांना सहभागी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “हवामान बदल हे बालहक्कांसाठी संकट आहे कारण मुले कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई न करता त्याचे परिणाम सहन करतात. हे विचारात घेऊन, युनिसेफ मुंबईने युवा कार्यकर्त्यांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण विकसित केले असून त्यासाठीची सुविधा आणि तरुणांची क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने युवा कार्यकर्त्यांना सहाय्य देण्यासाठी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन (सीईई) पुणे, युवा गट, नेहरू युवा केंद्र यांच्याशी हातमिळवणी केली आहे. जागृती, प्रशिक्षण आदीच्या माध्यमातून राज्यात हवामान बदलांवर बोलणारे, त्यासाठी काम करणारे युवा गट तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे कबीर यांनी सांगितले.

एनएसएसः राज्यभरातील स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व

एनएसएस राज्यभरातील स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व करणार असून ‘हरित आणि स्वच्छ महाराष्ट्र’ या विषयावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. वृक्षारोपण व संवर्धन मोहीमेचाही त्यात समावेश असणार आहे. आम्हाला या मोहिमेद्वारे पर्यावरण जागृतीचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत आणि ते अंमलात आणायचे आहेत असे राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनाजे यांनी सांगितले.

महाराष्ट्र अर्बन वॉश अँड एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन कोलिशनच्या (महा-यूडब्ल्यूईएस-सी) संचालक, सचिवालय उत्कर्षा कवडी म्हणाल्या, पर्यावरण समस्यांच्या जागतिक परिणामांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक उपाय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. या उद्देशाने, महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एन्व्हायर्नमेंटल सॅनिटेशन कोएलिशन, सरकारी योजना आणि मिशनअंतर्गत विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना तसेच इतर विकास संस्थांना पाठिंबा देण्यासाठी काम करतात. राज्याच्या या मोहीमेमध्ये महा-यूडब्ल्यूईएस-सीचा संपूर्ण सहभाग असेल.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.