मोठी बातमी | माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर
Manohar joshi Health Update : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दुपारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच रूग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे.
निवृत्ती बाबर, मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना दुपारी हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मनोहर जोशी यांना नेमकं कोणत्या कारणामुळे रूग्णालयात दाखल केलेलं याबाबत दुपारी कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. आता हिंदुजा रूग्णालयाकडून मनोहर जोशी यांना प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे. मनोहर जोशींना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे. आता ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत. मनोहर जोशी यांचे माजी स्वीय सहायक अनिल त्रिवेदी यांनी ही त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
ब्रेन हॅमरेजचा झालेलात्रास
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं.