Uddhav Thackeray: तुमचे अश्रू माझी ताकद ;महाराष्ट्राचे मानले आभार;माजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जनेतेचे जिंकले मन

लोकशाही वाचवणं गरेजेचे आहे, हे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही धोक्यात आली आहे. त्यासाठी लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत, त्या चार स्तंभांनी पुढं येऊन धोक्यात आलेली लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही त्यांनी सांगितले.

Uddhav Thackeray: तुमचे अश्रू माझी ताकद ;महाराष्ट्राचे मानले आभार;माजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा जनेतेचे जिंकले मन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मानले जनेतेचे आभारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 3:08 PM

मुंबईः बंडखोरी नाट्यानंतर आणि एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांनी पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळीही त्यांनी आरेचा प्रश्न आणि आरेविषयी (aarey metro car shed)  झालेल्या निर्णयाविषयी आपली भूमिका मांडताना भावनिक आवाहन करत म्हणाले, माझ्यावरती राग आहे ना, माझ्यावर काढ पण माझा राग मुंबईवरती काढू नका, पण मुंबईच्या काळजात कट्यार खुपसू नका. यावेळी त्यांनी त्यासाठी हात जोडून विनंती करत आरे कार शेडविषयी आपली भूमिका मांडली.

मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका आणि कांजूरमार्गाचा जो पर्याय दिला आहे त्यामध्ये कोणताही अहमगंड नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईचे 800 एकरचे जंगल राखीव

यावेळी त्यांनी आरेविषयी बोलताना त्यांनी पर्यावरण, वन्यजीव आणि मुंबईतील 800 एकरचे जंगल कसे राखीव ठेवले आहे, त्याविषयीही त्यांनी आपली भूमिका मांडली.

लोकशाहीसाठी चार स्तंभांना आवाहन

लोकशाही वाचवणं गरेजेचे आहे, हे सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकशाही धोक्यात आली आहे. त्यासाठी लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत, त्या चार स्तंभांनी पुढं येऊन धोक्यात आलेली लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असंही त्यांनी सांगितले.

जनतेचे प्रेम कळले

मुंबईचे पर्यावरण, आरे जंगल, लोकशाही याविषयी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील जननेतेने वेळोवेळी दाखवलेले प्रेम, त्यांनी व्यक्त केलेली भावना त्याविषयी त्यांनी आभार मानत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला सोडताना शिवसैनिकांनी, मुंबईकरानी आणि सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांच्याविषयी दाखवलेले प्रेम त्याविषयी त्यांनी आभार मानताना सांगितले की, गेल्या आठ दिवसात माझ्या बद्दलची जी भावना होता ती मला समजली. त्याबद्दल त्यांनी तमाम महाराष्ट्राचे आभार मानत तुमचे अश्रू माझी ताकद असल्याचे सांगत त्याबद्दल मी हारामखोरपणा करणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.