“भाजपला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत पुंगी वाजवतील”; उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट इशाराच दिला…

उद्धव ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात बोलताना सांगितले की, जिथे आव्हान आहे तिथे शिवसेना आहे, आणि जिथे शिवसेना आहे तिथं आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेतून काल जी माणसं गेली आहेत. त्याचा काहीही एक परिणाम शिवसेनेवर होणार नाही.

भाजपला जोपर्यंत उपयोग आहे तोपर्यंत पुंगी वाजवतील; उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट इशाराच दिला...
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 9:12 PM

मुंबई : गेल्या 57 वर्षापासून मराठी माणसांवर ज्या शिवसेनेने राज्य केले ती शिवसेना, तो पक्ष आणि त्या पक्षानंतर आता माझे वडिलही चोरण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांनी माझे वडिलही चोऱ्यानाचा प्रयत्न केला असला तरी शिवसैनिकांच्या मनातील बाळासाहेब ठाकरे कसे चोरणार असा सवाल आजच्या सभेत माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतून बोलताना त्यांनी शिवसेनेसह भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपवर टीका करताना भाजपला त्यांनी पुंगी वाजवण्याचं काम करणारा पक्ष म्हणूनही भाजपची त्यांनी खिल्ली उडवली आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा इतिहास सांगताना त्यांनी गेल्या 57 वर्षात मराठी माणसांसाठी सेनेने केलेल्या कामाचा दाखला देत, त्या शिवसेनेबरोबर सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटावर त्यांनी सडकून टीका केली आहे.

शिवसेनेने सुख पेरले

यावेळी त्यांनी मराठी माणूस संघर्ष करतो. ज्या मराठी माणसांनी गेल्या कित्येक शतकांपासून संघर्ष केला. त्या माणसांच्या आयुष्यात हलकेपुलके क्षण यावेत यासाठी शिवसेनेने मार्मिकसारखे मासिक काढून मराठी माणसाच्या आयुष्यात सुख पेरण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्या टेबलवर नाचायचं

ज्यांनी मुंबई-सुरत-गुवाहटी असा प्रवास केला आहे, त्यांनी आता टुरिस्ट कंपनी कशी चालवायची हे जसं माहिती आहे, त्याच प्रकारे आता खऱ्या शिवसैनिकांना आता रेडा कुठं कापायचा आणि गोव्याला जाऊन कोणत्या टेबलवर जाऊन नाचायचं हे सगळं माहिती आहे असं म्हणत त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

जाणाऱ्यांना खुशाल जाऊ द्या

उद्धव ठाकरे यांनी आजच्या मेळाव्यात बोलताना सांगितले की, जिथे आव्हान आहे तिथे शिवसेना आहे, आणि जिथे शिवसेना आहे तिथं आव्हान आहे. त्यामुळे शिवसेनेतून काल जी माणसं गेली आहेत. त्याचा काहीही एक परिणाम शिवसेनेवर होणार नाही.

कोण पाहिजे त्याची यादी द्या

तसेच ज्यांना आणि कुणाला शिवसेना सोडून जायची आहे. त्यांनी खुशाल जावे, नाही तर ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली आहे. त्यांच्यासह शिंदे गटाने आणि भाजपने जे कोणी तुम्हाला पाहिजे. त्यांची यादीच माझ्याकडे द्या, मीच त्यांना तुम्हाला तुमच्याकडे पाठवतो असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उद्या गद्दार दिन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेल्या आमदार, खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्याला आता उद्या एक वर्षे पूर्ण होते आहे. त्यामुळे त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी उद्या गद्दार दिन असल्याचा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.