Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात, खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅडमिट

खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अंमलबजावणी संचलनालयाने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक केली होती

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात, खांद्याच्या शस्त्रक्रियेसाठी अ‍ॅडमिट
अनिल देशमुख Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 2:22 PM

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं आहे. खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी, 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या (money laundering) आरोपांखाली त्यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती. देशमुखांना आता कोणत्या हॉस्पिटलमध्ये (shoulder surgery) दाखल करण्यात आलं आहे, याविषयी माहिती मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालेली.

पाहा एएनआयचे ट्वीट

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.

परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर निलंबित एपीआय सचिन वाझे याच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ही चूक होती, राऊतांची पहिल्यांदाच कबुली

मलिक देशमुखांचा जेलमधील मुक्काम वाढणार

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच! जामीन अर्ज कोर्टाने नाकारला, अडचणी आणखी वाढणार?