अनिल देशमुखांना आणखी एक दणका; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला; पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी

गृहमंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल देशमुख यांनी शंभर कोटी वसुली केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील महिन्यात त्यांचे सहकारी स्वीय सहायकांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असल्याचे दिसत आहे.

अनिल देशमुखांना आणखी एक दणका; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला; पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 7:57 PM

मुंबई : गृहमंत्रीपदाचा गैरवापर करून अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Mumbai Police Commissioner Paramveer Singh) यांनी केले होते. त्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ईडीकडून अनिल देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख ईडीच्या ताब्यात असून त्यांनी आपल्याला जामीन मिळावा म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर आताही अनिल देशमुख यांनी मुंबई सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र यावेळी ईडीकडून विरोध दर्शविण्यात आल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून (Bail application rejected) लावला असून आता पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी

अनिल देशमुख यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी मुंबई सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र या अर्जावर सुनावणी होत असताना ईडीकडून विरोध करण्यात आल्याने त्यांच्या अर्जाला ईडीकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबतची पुढील सुनावणी 10 ऑगस्ट रोजी होणार असून त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 स्वीय सचिवासह आणखी एकावर आरोप पत्र

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी मागील महिन्यातही त्यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र 2 जून रोजी सीबीआयकडून देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्यावरही आरोपपत्र दाखल केले होते.

शंभर कोटी वसुली प्रकरण अंगलट

गृहमंत्रीपदाचा गैरवापर करुन अनिल देशमुख यांनी शंभर कोटी वसुली केल्याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील महिन्यात त्यांचे सहकारी स्वीय सहायकांवरही गुन्हा दाखल करण्यात आल्याने अनिल देशमुखांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे असल्याचे दिसत आहे. तआता त्यांच्या जामीन अर्जावर 10 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार असल्याने राजकीय वर्तुळासह त्यांच्याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.