VIDEO : “कल खेल में, हम हों न हों…” प्रकृतीत सुधारणा होताच विनोद कांबळी पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर
विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
Vinod Kambli Health Update : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. शनिवारी रात्री विनोद कांबळी यांची प्रकृती खालवली. त्यांच्यावर भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. विनोद कांबळीच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. विनोद कांबळी यांच्यावर उपचार झाल्यानंतर स्वत: तब्येतीबद्दलची अपडेट दिली आहे.
विनोद कांबळी यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकृती कशी आहे याबद्दलची सविस्तर अपडेट दिली. तसेच विनोद कांबळींनी कल खेल मे हम हो ना हो गर्दिष मे तारे रहेंगे सदा, हे गाणंही म्हटलं. या गाण्यातून त्यांनी आठवणींना उजाळा दिला. तसेच विनोद कांबळींनी ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या.
“मी धावायला सुरुवात करणार”
“मला डॉक्टरांनी फिजिओथेरपी करायला सांगितल्या आहेत, जेणेकरुन मी चालू-फिरु शकतो. पण मी एवढंच सांगेन की आय विल बी बॅक. मी पुन्हा येईन, हे मी तुम्हाला सांगेन. माझी फिजिओथेरपी संपल्यानंतर मी धावायला सुरुवात करणार आहे”, असे विनोद कांबळी म्हणाले.
सर्वांचे माझ्यावर प्रेम
“मला ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे माझ्यावर प्रेम आहे. या सर्वांचे माझ्या कुटुंबावरही प्रेम आहे. ते कायम माझ्या डोळ्यासमोर येते. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचं नाव घेतलं तर रेकॉर्डचं रेकॉर्ड सापडतील”. या असे विनोद कांबळी म्हणाले.
विनोद कांबळींनी म्हटलं गाणं
यानंतर विनोद कांबळींनी ख्रिसमसच्या शुभेच्छाही दिल्या. तसेच यावेळी विनोद कांबळींनी एक गाणंही म्हटलं. “कल खेल में, हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा, भूलोगे तुम, भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा”, या गाण्याच्या काही ओळी विनोद कांबळींनी म्हटल्या.
दरम्यान विनोद कांबळीचा सचिन तेंडुलकरसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत एका कार्यक्रमासाठी सचिन आणि विनोद कांबळी दोघे देखील आले होते. यावेळी त्याने सचिनची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला खुर्चीवरून उठता देखील आले नाही, तर याच कार्यक्रमात त्याने आपले गुरू रमाकांत आचरेकर सर यांच्या आठवणीत एक गाणं म्हटलं होतं, तेव्हा देखील त्याचे शब्द अडखळत होते. यानंतर विनोद कांबळीला काय झालं, याबद्दलची चर्चा रंगली होती.