Mumbai : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मोहित कंबोजही सोबत

एजन्सीज आपले काम करत आहेत. 650 लोकांची घरे तुम्ही हिरावली. 100 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार हा मसलपावर वापरून केला. संजय राऊत यांचे राजकारण नेहमीच खालच्या दर्जाचे राहिलेले आहे, अशी टीका मोहित कंबोज यांनी केली आहे.

Mumbai : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, मोहित कंबोजही सोबत
मोहित कंबोज आणि अस्लम शेखImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 10:00 PM

मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन ते फडणवीसांना भेटले आहे. अत्यंत गुप्त पद्धतीने ही भेट झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. या भेटीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तर सागर बंगल्यामधून बाहेर पडल्यावर मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीतून दोघही निघाले. दरम्यान, मोहित कंबोज यांच्याशी टीव्ही 9ने संवाद साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर नाही तर माझा आज वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आम्ही याठिकाणी आलो होतो, अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईबद्दलही ते बोलले. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘या सर्वांशी माझा काहीही संबंध नाही’

मोहित कंबोज म्हणाले, की एजन्सीज आपले काम करत आहेत. 650 लोकांची घरे तुम्ही हिरावली. 100 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार हा मसलपावर वापरून केला. संजय राऊत यांचे राजकारण नेहमीच खालच्या दर्जाचे राहिलेले आहे. दररोज सकाळी उठून सलीम जावेद स्वत:ची स्टोरी घेऊन यायचे. सलीम जावेदचे मिलन होणारच होते, तो दिवस आता आला. या सर्वांशी माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरणही मोहित कंबोज यांनी दिले आहे. मी एवढा मोठा माणूस नाही. या सगळ्याशी माझे देणेघेणे नाही. त्यांचीच कर्म आता जगासमोर आली आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

‘पुढे कोण?’

संजय पांडेचे काम काय, ते आता समोर आले आहे. तर संजय राऊत आणि नवाब मलिक हे डबल आयडेंटीटी माणसे आहेत. मसल पॉवर, मॅन पॉवर वापरत यांनी जमिनी हडपल्या, घरे हडपली. तर संजय राऊत हा खूप चलाख माणूस आहे. मुद्दे कसे डायव्हर्ट करायचे, सामनात काय काय करायचे, हे आता समोर आले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, मोहित कंबोज यांनी ट्विटही केले आहे. संजय राऊतांना अटक. नवाब मलिक, संजय पांडे आणि आता संजय राऊत… पुढे कोण? असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या ईडी कारवाईमागे कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.