“वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना कशाचे डोंबलाचे राजकारण करता”; उद्धव ठाकरेंना या नेत्यानं ठरवलं गद्दार

रामदार कदम यांनी मागील निवडणुकीवर बोलताना त्यांनी आम्ही सगळे मागच्या निवडणूका बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यां दोघांचे फोटो होते.

वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना कशाचे डोंबलाचे राजकारण करता; उद्धव ठाकरेंना या नेत्यानं ठरवलं गद्दार
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 11:08 PM

मुंबईः हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं राजकारणावरून जोरदार राजकीय हंगामा सुरु आहे. एकीकडे शिंदे गटाने ठाकरे गटाने तैलचित्रावरुन घाणरेडे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. तर ठाकरे गटाने वडिल चोरतात, गद्दार म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तैलचित्रावरून चाललेल्या राजकारणावरून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदार कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे.

तैलचित्र आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला तरी ठाकरे गटाने राजकारण बाजूला ठेऊन या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहिले पाहिजे होते अशी टीका रामदास कदम यांनी ठाकरे गटावर केली आहे.

उद्धव ठाकरे यानी यावेळी मनाचा मोठेपणा दाखवून या कार्यक्रमाला आले असते तर चांगले झाले असते अशी टिप्पणी त्यांनी यावेळी केल्याचेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिवशी तरी ठाकरे गटाने राजकारण बाजूला ठेवला पाहिजे होता. कारण हा काही राजकीय कार्यक्रम नव्हता. अशा कार्यक्रमातूनही जर राजकारण करत असाल तर चुकीचे आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं आणि इतरांना बदनाम करायचं असेल तर त्याची नोंद महाराष्ट्र घेईल असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

ज्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय झाला तेव्हापासून तैलचित्रावरून राजकारण तापले आहे. त्यातच कार्यक्रम पत्रिकेतील नावावरून राजकारण तापले होते.

त्यामुळे वडील म्हणून ज्यांचे नाव लावता त्यांचे तैलचित्र लावताना कशाचे डोंबलाचे राजकारण करता का असा सवाल रामदार कदम यांनी केला आहे.

राजकीय कारकीर्दीविषयी बोलताना आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाविषयी बोलतान रामदास कदम यांनी आपण आणि बाळासाहेब ठाकरे यांनी राजकारण कसे केले त्याचेही उदाहरण त्यांनी दिले.

यावरून त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, आपण राजकारणात नव्हतात तेव्हापासून आम्ही बाळासाहेंबांसोबत असल्याचे त्यांनी त्यांना ठणकाऊन सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जाऊन उद्धवजी तुम्हीदेखील बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी केलीच ना असा टीकाही त्यांच्यावर करण्यात आली.

रामदार कदम यांनी मागील निवडणुकीवर बोलताना त्यांनी आम्ही सगळे मागच्या निवडणूका बाळासाहेब आणि नरेंद्र मोदी यां दोघांचे फोटो होते.

जर तुमच्यामध्ये हिम्मत होती तर तुम्ही सर्वांचे राजीनामा घेऊन पुन्हा निवडणूक लढून तुम्ही मुख्यमंत्री व्हायला हवं होतं. मात्र तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तु्म्ही गद्दारी केली आहे.

तु्म्ही ज्या प्रमाणे विचारांशी गद्दारी केली त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्यासोबत आता राजकीय पक्ष कोणतेच नाहीत म्हणून वंचित बहुजन आघाडीला तुम्ही बरोबर घेत आहात.

त्यामुळेचे तुमची अशी अवस्था झाली आहे. आज उद्धवजींचा कार्यकाळ संपला म्हणातात, मात्र ते ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह गेले तेव्हाच उद्धव ठाकरे यांची कारकीर्द संपली होती अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.