सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

सीमाभागातील 865 गावांकडे महाराष्ट्र सरकारचच दुर्लक्ष; या नेत्याने सरकारचाच दुटप्पीपणा सांगितला
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 6:16 PM

मुंबईः महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांसह सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांवर आणि अक्कलकोट, पंढरपूरावर कर्नाटचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी दावा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यानंतर कर्नाटकच्या सरकारवर राज्यसरकारसह विरोधकांनी जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आता कर्नाटक सरकारऐवजी राज्य सरकारवरच दुटप्पीपणाचा ठपका ठेवत निशाणा साधला आहे.

कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील 865 गावांकडे अजूनपर्यंत दुर्लक्ष का झालं असा सवाल स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

कर्नाटकात मराठी भाषिकांची गावं असतानाही आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत. एकीकडे आपली गावं बोलायची आणि दुर्लक्ष करायचं ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

सीमाभागातील मराठी भाषिक गावांविषयी एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ही आमची गावं आहेत असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र या गावांकडे दुर्लक्ष करायचं असा दुटप्पीपणा सरकारकडून का केला जात आहे त्याचं आत्मपरिक्षण करणे गरजेचं आहे असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या गावांना नावं ठेवण्यापेक्षा आणि त्यांना दोष देण्यापेक्षा या सीमाभागाकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याचाही अतंमुर्ख होऊन राज्य सरकारने विचार केला पाहिजे अशी टीका त्यांनी राज्य सरकारवरही केली आहे.

मागील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून जोरदार वादळ उठले आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी थेट महाराष्ट्रातीलच गावांवर दावा केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

त्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र सरकारनेच सीमाभागातील 865 गावांकडे दुर्लक्ष केले असल्याचे सांगितले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.