Video : पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांचा झिंगाट Dance
मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishoro Pednekar) यांनी मनसोक्त डान्स (Dance) केला. येथील एका कार्यक्रमात महिला भगिणींसोबत किशोरी पेडणेकर यांनी ताल धरला. आता या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे.

मुंबई : माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishoro Pednekar) यांनी मनसोक्त डान्स (Dance) केला. येथील एका कार्यक्रमात महिला भगिणींसोबत किशोरी पेडणेकर यांनी ताल धरला. आता या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल (Viral) झाला आहे. मुंबई महापालिकेची मुदत संपल्यावर माजी महापौर सध्या पक्षाच्या कामात आणि कार्यक्रमात व्यस्त आहेत. आपल्या वार्डातील महिलांसोबत एका कार्यक्रमात महापौरांनी गाण्यावर ताल धरला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागृत मंचतर्फे खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन महिला भगिणींसाठी करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि सहभाग पाहायला मिळाला.
#जागृत_मंच #full2masti pic.twitter.com/lwSJ7Q1Yt5
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 12, 2022
नवी इनिंग सुरू
नगरसेवक म्हणून पाच वर्ष पूर्ण झाली. आता नवीन इनिंग सुरू होईल. आता जोमाने पुन्हा काम करू, असे किशोरी पेडणेकर आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर म्हणाल्या. एक परिचारिका म्हणून काम केले होते. मग कोरोनाकाळात स्थिती हाताळण्याची संधी मिळाली. नवीन प्रारंभात पक्षाची बांधणी करण्यासाठी तयारी करू. मी देवाचे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानते, असेही त्या म्हणाल्या.
‘आव्हानांना संधी म्हणून काम करू’
कोरोना काळात मुंबई देशात अव्वल आहे. पक्षप्रमुखांनी दिलेली जबाबदारी आम्ही व्यवस्थित पार पाडून, आव्हानांना संधी म्हणून काम करू, असे त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार, लोकांच्या प्रतिसादाने शिवसेनेचा महापौर असेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
सध्याच्या राजकारणावर नाराजी
सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. किरीय सोमैया, राणे कुटुंब ज्या पद्धतीने वागत आहे, त्यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. वैयक्तिक टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला.