Maharashtra Din 2023 : पूर्वीचा कसाईवाडा, केवळ 11 लाख खर्च करून आता झालंय मुंबईतलं सर्वात मोठं मार्केट

इ.स. 1865 ते 1871 पर्यंत मशारनिल्हे हे मुंबई महापालिका आयुक्त होते. त्यावेळी 1868 मध्ये त्यांनी हे मार्केट बांधले. ते आयुक्त झाले त्यावेळी या मार्केट शेजारी मोठा प्रमाणात “कसाईवाडे” होते.

Maharashtra Din 2023 : पूर्वीचा कसाईवाडा, केवळ 11 लाख खर्च करून आता झालंय मुंबईतलं सर्वात मोठं मार्केट
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 1:35 PM

मुंबई : ‘A very handsome building which in general appearance in the convenience and cleanliness of all its internal arrangements, is not surpassed by any market in the world’ असं या मार्केटबद्दल म्हटलं जातं. याचा अर्थ ‘या मार्केटची इमारत इतकी सुंदर आणि मनोवेधक आहे की तिचा सर्वसाधारण बाह्य देखावा, तिच्यांमध्ये केलेल्या सोई, आतला नीटनेटकेपणा, स्वच्छता यात तिची बरोबरी करणारी अन्य कुठलीही सुंदर इमारत या जगात नाही.’ विशेष म्हणजे ही इमारत उभी राहण्यापूर्वी याच जागेवर भला मोठा कसाईवाडा होता. तो हटवून थेटच ही इमारत बांधण्यात आली होती. विशेष म्हणजे केवळ 11 लाख रुपये खर्च करून ही सुंदर इमारत बांधण्यात आली होती.

इ.स. 1865 ते 1871 पर्यंत मशारनिल्हे हे मुंबई महापालिका आयुक्त होते. त्यावेळी 1868 मध्ये त्यांनी हे मार्केट बांधले. ते आयुक्त झाले त्यावेळी या मार्केट शेजारी मोठा प्रमाणात “कसाईवाडे” होते. त्यामुळे मांसाहारी नसलेली लोकांना या मार्केटमध्ये येण्यास मोठे जिवावर येत असे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन मशारनिल्हे यांनी त्या हा सर्व कसाईवाडा मुंबईपासून दहा मैलांवर म्हणजेच बांद्रा इथे हलवला. कसाईवाड्यातील मांस मुंबईत आणण्यासाठी स्वतंत्र रेल्वे गाड्याची व्यवस्था करण्यात आली होती. या गाड्या बहुतेक करून पहाटेच येत असत.

हे सुद्धा वाचा

मुंबईचे पहिले आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांनी मुंबईत अनेक सुधारणा केल्या होत्या. त्या सर्व शहरात राहणाऱ्या रहिवाशांच्या सुखासाठीच केल्या होत्या. त्यामुळेच या इमारतीला त्यांचे नाव देण्यात आले. त्या नावावरून आता क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात महत्वाचे मार्केट म्हणून ओळखले जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बाजारांमध्ये क्रॉफर्ड मार्केटचा समावेश होतो तो यामुळेच.

क्रॉफर्ड मार्केटची जागा एकदंर ७२,००० चौरस यार्ड आहे. या मार्केटमध्ये शिरताना पश्चिम बाजूला एक मोठा दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या वरच्या भिंतीवर वाणी लोकांच्या बायका डोक्यावर पाण्याचे घडे घेऊन चालल्या आहेत. कोणी शेट सावकार इकडून तिकडे फिरत आहेत असा मजेशीर देखावा दाखविला आहे. इमारतीला काचेच्या खिडक्या, सुंदर दगडी कोरीव काम, गॉथिक शैलीतील बुरुज बांधले आहेत. ही इमारत भारतातील व्हिक्टोरियन गॉथिक वास्तुकलेचे उल्लेखनीय उदाहरण म्हणून ओळखली जाते.

बुरुजावर भले मोठे घड्याळ

या मार्केटला तीन मुख्य दरवाजे असून मध्ये एक हॉल आहे. मार्केटचे सर्व काम हे सफेद पोरबंदरी आणि वसईचा लाल दगड यांचे मिश्रण करून केले आहे. इमारतीच्या १८० फूट उंचीवर बुरुजावर एक भले मोठे घड्याळ असून ते फार लांबूनही दिसते. रात्रीच्या वेळी पाहणारास वेळ दिसावा म्हणून त्यात गॅसच्या दिव्याचीही योजना केली होती.

मार्केट बांधण्यासाठी 11,18,500 रुपये इतका खर्च

क्रॉफर्ड मार्केटच्या फळ फळावळीच्या बाजूच्या भागाचे क्षेत्रफळ 15000 चौरस फूट, मसाले,भाजी वगैरे विकण्याकरिता जी जागा आहे तिचे क्षेत्रफळ 35,000 चौरस फूट आहे. सगळ्या भिंती 30 फूट उंचीच्या असून त्याच्यावर पत्रे लावले होते. हे मार्केट बांधण्यासाठी त्याकाळी एकूण 11,18,500 रुपये इतका खर्च झाला होता. मुंबई शहरांतील सरासरीनें 1/3 लोक या मार्केटमध्ये येत होते. येथील सर्व मार्केटचा महापालिकेला तेव्हा 80,000 रुपये खर्च येत होता तर त्यामधून 2,12,000 रुपये इतके उत्पन्न मिळत होते.

सर कावसजी जहांगीर यांनी बांधलेले कारंजे

क्रॉफर्ड मार्केटच्या इमारतीत शिरताच समोर एक कारंजे आहे. ते सर कावसजी जहांगीर यांनी बांधले होते. खाली जमिनीकडे पाहिल्यास पांढऱ्या शुभ्र दगडांनी पिटल्यामुळे जणू काय शुभ्र गालीचाच पसरला आहे असा भास होतो. त्यावर पडलेला केर कचरा केरसुणीने सारखा साफ करण्यात येतो. वर पाहिले तर सर्व लोखंडी काम दृष्टीस पडते. ते अति भव्य लोखंडी गज कोणीही अगदी दंग होऊन पहात असत.

हे ही वाचा : MUMBAI HISTORY 3 : मुंबईतील असे ठिकाण ज्याला भगवान श्री राम आणि लक्ष्मण यांचा झाला होता पदस्पर्श, काय आहे कथा ?

जोडप्यांचे मार्केट

क्रॉफर्ड मार्केटला त्या काळी गंमतीने जोडप्यांचे मार्केट असे म्हटले जायचे. कारण संध्याकाळी तेथे अनेक साहेब लोक आपल्या पत्नीसह इथे फिरायला येत असत. दक्षिण बाजूला असलेल्या बागेत ते विरंगुळ्यासाठी जात. या बागेत बसण्यासाठी जागोजागी बांक ठेवले होते. त्यावर बसणाऱ्यांना छाया मिळावी म्हणून तेथे छतही बांधण्यात आले होते.

पूर्वीचे क्रॉफर्ड मार्केट

क्रॉफर्ड मार्केटच्या उत्तर बाजूला बुटांची दुकाने होती. तेथे इंग्रजी बूट विकत असत. तर, बाजूच्या मैदानात पोलीस चौकी शेजारच्या मोकळ्या जागेत गावठी बूट आणि ब्राह्मणी जोडे मिळत असत. संध्याकाळी 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत इथे मोची बसत.

या मार्केट शेजारीच एका लहानशा गल्लीत बिछानें, उशा, पासोड्या यांची दुकाने होती. जुमा मशिदीच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर बोहरी लोकांच्या दुकानात किराणा माल मिळत असे. त्यापुढे छत्र्या विकणारे बसत. या दुकानात येणारा माल हा विलायतमधून यायचा.

कुंभारवाडयाचा नाका ते थेट भुलेश्वर, मुंबादेवीपर्यंत मेवा मिठाईची दुकाने पसरली होती. त्यात आज मितीला दोनच प्रसिद्ध दुकाने आहेत. एक गोपाळदासचे आणि दुसरे अमीचंद यांचे हलव्याचें दुकान. अजूनही त्या दुकानांवर इतर दुकानांवर जो माल मिळतो त्यापेक्षा अधिक चांगला मिळतो असे म्हणतात.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये उत्तम तऱ्हेची फळ फळावळ मिळते. पूर्वी रात्री गॅसचे दिवे पेटत असत. बाहेरच्या भागात कांसार, कांचेचे सामान विकणारे असल्याचे. त्यांचा प्रकाश या दिव्यावर पडून सर्व परिसर उजळून निघत असे.

याच मार्केटमध्ये पक्षी विकणारांची दुकाने आहेत. हजारो ठिकाणचे हजारो जातीचे पक्षी येथे मिळतात. त्यातील अनेक पक्षी फार मौल्यवान असतात. कोंबडीं बदके, मांजरी, कुत्रे, सफेद उंदीर, ससे असे विविध प्राणी येथे विकले जातात. मासळी बाजाराच्या शेजारी बटलर्स ‘कॉफी शॉप’ होती. इथे हजारो साहेब लोकांचे बुटलेर ब्रेकफास्ट आणण्यासाठी जात असत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.