Video: सोन्याच्या दुकानातून हातोहात चार तोळ्याचा नेकलेस लांबवला; बुरखाधारी महिलांकडून चोरी
कल्याण पश्चिमेच्या जरीमरी परिसरात एस. आर. शंकलेशा ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. या दुकानात 16 मे रोजी दुपारच्या सुमारास बुरखा घातलेल्या दोन महिला आल्या होत्या. त्यांनी दागिने पाहण्याचे नाटक करत चार नेकलेस पाहताना त्यातील एक नेकलेस हातोहात लांबविला.
कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) बुरखा घालून ज्वेलर्समध्ये आलेल्या दोन महिलांनी नेकलेस (Nackless) आणि कानातील दागिन्यांचा सेट चोरल्याची घटना घडलीय आहे. या महिलांची ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद (Theft CCTV captured) झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या चोरीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे सोन्याचे दुकानांदारामधून चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या रेल्वे स्टेशन, रात्रीच्या वेळी एकट्या व्यक्तीला अडवून मारहाण करणे, त्याचा ऐवज लंपास करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
हातोहात चार तोळ्याचं सोनं लांबवलं…#kalyan #Mumbai #mumbaipolice #mumbaicrime pic.twitter.com/SVc75BuKD8
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) May 20, 2022
कल्याण पश्चिमेच्या जरीमरी परिसरात एस. आर. शंकलेशा ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. या दुकानात 16 मे रोजी दुपारच्या सुमारास बुरखा घातलेल्या दोन महिला आल्या.
नेकलेस बघता बघता चोरी
दुकानात आल्यानंतर या महिलांनी नेकलेस सेट दाखवण्यास सांगितले. यानंतर दुकानदाराने त्यांच्यासमोर नेकलेस सेटचे 4-5 बॉक्स काढून ठेवले असता त्यातला एक बॉक्स या दोघींनी हातचलाखीने चोरून घेऊन गेल्या आहेत. या नेकलेस सेटचं वजन साडेचार तोळे होते.
चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत
चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. ही बाब लक्षात येताच मालक जयेश शंकलेशा यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेत या दोन अनोळखी महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्या महिलांचा शोध
सध्या पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्या महिलांचा शोध घेत असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.
चोऱ्यांचे प्रकार वाढले
दुकानातून चोरी, मारहाण करुन ऐवज लंपास करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशा मागणी नागरिक आणि व्यावसायिकांमधून होत आहे.