Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवउद्योजकांसाठी या सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती

नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. 

नवउद्योजकांसाठी या सेंटरमध्ये विनामुल्य प्रशिक्षणाची संधी, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
shubhash desai
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 2:10 PM

मुंबई : नवउद्योजक आणि स्टार्ट-अप्ससाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित होत असून निवड झालेल्या उद्योजकाला कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.  उद्योग विभाग आणि कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी देसाई बोलत होते. (Free Training Opportunity for Entrepreneurs in Business Incubator Center Says Indusrial Minister Subhash Desai)

या कार्यक्रमाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) वेणूगोपाल रेड्डी , महाराष्ट्र उद्योगविकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, कॉर्नेल महा 60 चे संचालक प्रोफेसर ॲलन यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाचे हे मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट पायाभूत पूरक वातावरण असलेले देशातील सर्वाधिक औद्योगिकरण असलेले महाराष्ट्र राज्य आहे. राज्यात नवीन तांत्रिक, उच्च कुशल मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेले तरुण उद्योजक आहेत.  या बिझनेस अ‌ॅक्सिलेटरमुळे महिलांसह अनुसूचित जाती व जमातीतील  तरुणांसह  राज्यातील उद्योजकांच्या प्रारंभिक विकासाला उत्तेजन देणे व त्याच्या व्यवसायाला वेग देणारी यंत्रणा बनविली गेली आहे. एमआयडीसीद्वारे या इनक्यूबेटर केंद्राचा सर्व खर्च उचलण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

अपूर्व व नाविन्यपूर्ण इनक्यूबेटर सेंटरसाठी उद्योग विभागाचे अभिनंदन करून राज्यमंत्री तटकरे यांनी या करारामुळे नवीन युगातील उद्योजक निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत व्यक्त केले.

कॉर्नेल हे जगप्रसिद्ध विद्यापीठ प्रथमच अमेरिकेबाहेर अशा प्रकारचे जागतिक दर्जाचा बिझनेस अ‌ॅक्सिलेटर स्थापन करीत आहे आणि अशा प्रकारचा भारतातील प्रथम प्रमाणित कोर्स आहे. “कॉर्नेल महा 60” हा कार्यक्रम या एक्सेलेरेटर अंतर्गत चालणार असून तो जवळजवळ वर्षभर निवडक 60 उद्योजकांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना कॉर्नेल विद्यापीठ यांचेकडून पदविका प्रमाणपत्रासह मूर्त व अमूर्त फायदे प्रदान केले जाणार आहेत.  तसेच त्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि उद्यम भांडवल निधीसारखी साधने देखील उपलब्ध करुन दिली जातील.

(Free Training Opportunity for Entrepreneurs in Business Incubator Center Says Indusrial Minister Subhash Desai)

संबंधित बातम्या

राज्यातील उद्योग चक्र फिरले, 13 लाख 86 हजार कामगार पुन्हा कामावर रुजू : सुभाष देसाई

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.