मनसे नेत्याने सुषमा अंधारे यांना डिवचले, नेत्याची जीभ घसरली; टीका नेमकी काय..?
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना छोटा नवाब आणि मोठा नवाब म्हणत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
मुंबईः ठाकरे गटावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गजानन काळे यांनी टीका करताना म्हणाले की, काळी मांजर म्हणत सारखं आडवी जाते असे म्हणताना त्यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे आता मनसे आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खासदार संजय राऊत ठेवले होते. आता त्यांना शांत बसवून या हे पार्सल राष्ट्रवादीतून ठाकरे गटाकडे का पाठवलय असा सवालही गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे भविष्यात गजानन काळे आणि सुषमा अंधारे वाद उफाळून येणार असल्याची चिन्हं दिसून येत आहेत.
संजय राऊत असो की सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे आणि या पक्षात आता उरलेसुरले दोघं बापलेकच राहणार असल्याचे दिसून येणार आहे असा खोचक टोला त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना लगावला आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना छोटा नवाब आणि मोठा नवाब म्हणत त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरे यांना जाहीर आव्हान करत ते म्हणाले की, त्यांनी आपल्या घराचा परिसर सोडून वरळीतून निवडणूक का लढवली आहे असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या डीएड शिक्षक भरतीवेळी दहावी पर्यंत मराठीतून शिक्षण झाले म्हणून यांना मुंबई महानगरपालिकेत भरती केली. आता इंग्रजीमधून डीएड केलेले शिक्षक मराठीचे कैवारी होणार का असा सवाल त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला विचारला आहे.
कोरोना काळात अडीच वर्षे घरात बसून, फेसबूक ऑनलाईन करून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री पदाचा पुरस्कार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कुठला क्षेत्रात घोटाळा झाला नाही असं नाही. सगळ्या क्षेत्रात यांचा घोटाळा अगदी उंदीर मारण्यातही यांनी घोटाळा करत ठाकरे गटावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.