मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांचा अमोल कीर्तिकर यांना निकालाविरोधात कोर्टात जाण्याचा सल्ला

"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक अधिकारी आरोची नेमणूक करतात. यात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मग जर वंदना सूर्यवंशी यांची नेमणूक झाली तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत. मग त्यांची नेमणूक ही कोणाच्या सांगण्यावरून झाली?", असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला.

मोठी बातमी! गजानन कीर्तिकर यांचा अमोल कीर्तिकर यांना निकालाविरोधात कोर्टात जाण्याचा सल्ला
कीर्तिकर पिता-पुत्र
Follow us
| Updated on: Jun 20, 2024 | 5:01 PM

शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गजानन कीर्तिकर यांनी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणीसाठी असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांबाबतही संशय व्यक्त केला आहे. संबंधित अधिकाऱ्यावर आधीच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असं गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार आमनेसामने होते. ठाकरे गटाकडून गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे उमेदवार होते. तर शिंदे गटाकडून रविंद्र वायकर हे उमेदवार होते. अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटाचे उमेदवार असले तरी त्यांचे वडील गजानन कीर्तिकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. असं असताना त्यांनी आपल्या मुलाला निकालाच्या विरोधात कोर्टात जाण्याचं आवाहन केलं आहे.

“इथे जी लोकसभेची निवडणूक झाली, त्यामध्ये अमोल कीर्तीकर यांना बरेचशे आक्षेप आहेत. निवडणूक अधिकारी निवडणूक प्रक्रियेवर आणि त्यामुळे मी त्यांना कोर्टामध्ये जाण्याचा सल्ला दिलेला आहे त्यानुसार ते कोर्टात जात आहे”, असं मोठं वक्तव्य गजानन कीर्तिकर यांनी केलं आहे. “जो आक्षेप घ्यायचा तो कोर्टात घे असं मी त्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. माझी कुठलीच नाराजी नाही. मी गेल्या 58 वर्षे या पक्षामध्ये काम करतोय. त्यापैकी 56 वर्ष मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो. त्यांच्या शिवसेनेसोबत काम केलं आणि मागील दोन वर्षापासून मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे मी नाराज नाही”, असं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

गजानन कीर्तिकर यांच्याकडून संशय व्यक्त

“सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवडणूक अधिकारी आरोची नेमणूक करतात. यात जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. मग जर वंदना सूर्यवंशी यांची नेमणूक झाली तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे एवढे आरोप आहेत. मग त्यांची नेमणूक ही कोणाच्या सांगण्यावरून झाली? हा माझा मूळ प्रश्न आहे आणि कुणाचा दावा होता, कुणी शिफारस केली? निर्णय अधिकारी जो नेमला, मुंबई उपनगरचे कलेक्टर यांनी नेमणूक केली. कोणते निकष पाहीले, वंदना सूर्यवंशीची वंदना सूर्यवंशी यांची पार्श्वभूमी ही भ्रष्टाचाराने युक्त आहे याची चौकशी व्हायला पाहिजे”, असं गजानन कीर्तिकर म्हणाले.

“19 व्या राऊंड नंतर फलकावर सांगण्यात आलं नाही. घोषणा करण्यात आली नाही. यामुळे या संपूर्ण तांत्रिक प्रक्रियेवर संशय निर्माण होत आहे. आधी सांगितलं जिंकले. मग सांगितलं की 48 मते त्यांना पडली. मग 48 मताने हरले सांगितलं. या सगळ्या गोष्टी संशय निर्माण करतात. निवडणुकीच्या दिवशी तिथे प्रत्यक्ष काय घडलं हे मला काही माहीत नाही. मी तज्ज्ञ नाही, त्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही”, असं कीर्तिकर म्हणाले.

‘आमच्यात कुठलीही घरफोडी नाही’

“आमच्यात कुठलीही घरफोडी भाजपने केलेली नाही. एक पिता आणि पुत्र म्हणून आम्ही एकत्र राहतो. त्याने माझ्यासोबत राहण्याचा दोन वर्षांपूर्वी निर्णय घेतला. मी देखील त्याला मान्यता दिली. आता तो स्वतःच्या पक्षाचं काम करतो. मी माझ्या पक्षाचे काम करतो”, असा खुलासा गजानन कीर्तिकर यांनी केला.

‘मी माझं कर्तव्य पार पाडलं’

“निवडणूक लढवण्याचा माझा कुठलाही विचार नाही. निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी पक्षासाठी काम करेन. संघटनात्मक बांधणी करणार. काल वर्धापन दिनानिमित्त रविंद्र वायकर यांना देखील भेटलो. त्यांना देखील मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांनी देखील त्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत. माझ्या पक्षाचा उमेदवार म्हणून माझं कर्तव्य होतं ते मी पार पाडले”, अशी प्रतिक्रिया गजानन कीर्तिकर यांनी दिली.

कीर्तिकर यांचा शिशिर शिंदे यांच्यावर निशाणा

“बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेसची साथ धरली नाही. त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला”, असं गजानन कीर्तिकर म्हणाले. “शिशिर शिंदे स्वतः दल बदलू नेता आहे. तो मला शिकवणार नेमकं काय करायचं? त्याच्याकडून मी धडे घ्यायचे? तो सांगणार का मला निष्ठा काय असते? ते मोजत नाही. त्याने मला फुकटचे सल्ले देऊ नये”, अशा कानपिचक्या गजानन कीर्तिकर यांनी टीका करणाऱ्यांना दिल्या. “ज्यावेळी त्यांनी पत्र लिहिलं मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला. मी म्हणालो की, मी याबद्दल स्पष्टीकरण देतो. ते म्हणाले की, याची काही गरज नाही, मी अॅक्शन घेणार नाही”, असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.