मुंबईत विकृतीचा कळस, चौघांचा कुत्र्यावर गँगरेप

मुंबई: माणसांमधील विकृतीने कळस गाठल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता किळसवाणा प्रकार घडला आहे. चार नराधमांनी चक्क कुत्र्यावर बलात्कार केला. हा किळसवाणा प्रकार मालाडमधील मालवणी परिसरात घडला. धक्कादायक म्हणजे आरोपी नराधम कुत्र्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले.  सध्या या कुत्र्यावर उपचार सुरु आहेत. याबाबतचं वृत्त मुंबई मिररने  दिलं […]

मुंबईत विकृतीचा कळस, चौघांचा कुत्र्यावर गँगरेप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: माणसांमधील विकृतीने कळस गाठल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना आता किळसवाणा प्रकार घडला आहे. चार नराधमांनी चक्क कुत्र्यावर बलात्कार केला. हा किळसवाणा प्रकार मालाडमधील मालवणी परिसरात घडला. धक्कादायक म्हणजे आरोपी नराधम कुत्र्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले.  सध्या या कुत्र्यावर उपचार सुरु आहेत. याबाबतचं वृत्त मुंबई मिररने  दिलं आहे.

‘अॅनिमल मॅटर टू मी’ या प्राणीमित्रांच्या स्वयंसेवी संस्थेने हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे.

“पीडित कुत्रा दिवसभर बेपत्ता होता. तो मालवणी परिसरातील चर्च परिसरात आढळला. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली आहे. या कुत्र्यावर प्रचंड आघात झाला आहे.  त्याच्याजवळ कोणी गेलं किंवा त्याला स्पर्श केला तर तो जोरजोरात ओरडून घाबरुन जात होता”, असं ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेच्या संस्थापिका डॉ अंकिता पाठक यांनी सांगितलं.

कुत्र्याच्या पुढच्या पायांना दुखापत झाली आहे. सध्या डॉक्टर कुत्र्यावर उपचार करत आहेत.

मालवणी परिसरातील स्थानिक सुधा फर्नांडिस या नेहमी कुत्र्यांना खाऊ घालतात. मात्र या कुत्र्याला नेहमीप्रमाणे खाऊ घातला असता, तो कुत्रा विव्हळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तो कोणालाही स्पर्श करु देत नव्हता.

यादरम्यान एका रिक्षा चालकाने फर्नांडिस यांना दिलेली माहिती अतिशय धक्कादायक होती. चार जणांनी या कुत्र्यावर बलात्कार केल्याचं रिक्षा ड्रायव्हरने फर्नांडिस यांना सांगितलं. “आरोपींनी कुत्र्याचे पाय बांधले होते, कुत्रा ओरडत होता, त्यामुळे आपल्याला हा प्रकार समजला. आरोपींचा विकृतपणा रोखण्यासाठी आपण गेलो असता आरोपींनी धूम ठोकली” असं रिक्षाचालकाने फर्नांडिस यांना सांगितलं.

दरम्यान, फर्नांडिस यांनी या सर्व प्रकारानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.