Special Railway: पर्यटकांना हेरून गुजरात ते गोवा स्पेशल रेल्वे गाड्या, विशेष गाड्यांची संपूर्ण माहिती
मुंबई, गणपतीच्या काळात (Ganpanti Special) कोकणात आपल्या स्वगावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रेमात असते. कोकणात जाण्यासाठी मुंबईहून (Train for konkan) जादा गाड्या सोडण्याची गरज असताना नागपूर, पुणे, पनवेल आणि रोहा-चिपळूण ( मेमू गाड्या ) सोडण्याचा प्रताप मध्य रेल्वेने केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेनेही मुंबई सेंटूल, वांद्रे टर्मिनससह गुजरातच्या उधना व विडठवामित्री येथूनही गोवा ( मडगाव ) व […]
मुंबई, गणपतीच्या काळात (Ganpanti Special) कोकणात आपल्या स्वगावी जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रेमात असते. कोकणात जाण्यासाठी मुंबईहून (Train for konkan) जादा गाड्या सोडण्याची गरज असताना नागपूर, पुणे, पनवेल आणि रोहा-चिपळूण ( मेमू गाड्या ) सोडण्याचा प्रताप मध्य रेल्वेने केल्यानंतर आता पश्चिम रेल्वेनेही मुंबई सेंटूल, वांद्रे टर्मिनससह गुजरातच्या उधना व विडठवामित्री येथूनही गोवा ( मडगाव ) व कर्नाटकच्या ठोकूर येथे 60 गणपती स्पेशल फेऱ्या सोडल्या आहेत. या गाड्यांचे भाडेही दणकून आहे. गोवा आणि कर्नाटकात (Goa and Karnataka) सुट्ट्यांनिमित्त जाणाऱ्या पर्यटकांना हेरून या गाड्या सोडल्या का ? असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे.
रेल्वे क्र. 090019: मुंबई सेंट्रल-ठोकूर साप्ताहिक स्पेशल (6 फेऱ्या) ही ट्रेन 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरदरम्यान दर मंगळवारी मुंबई सेंट्रलहून दुपारी 12 वाजता सुटून सकाळी 9.30 वा. ठोकूर येथे पोहचेल. रेल्वे क्र. 09002 ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 24 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी ठोकूरवरून सकाळी 10.45 वाजता सुटून मुंबई सेंट्रलला सकाळी 7.05 वाजता पोहचेल.
थांबे : बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकाम्बिका रोड, बायंदूर, कुंडापुरा, उडुपी, मुलकी आणि सुरतकल.
रेल्वे क्र. 09003 मुंबई सेंट्रल ते मडगाव स्पेशल (34 फेर्या) ही स्पेशल ट्रेन 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान दर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी मुंबई सेंट्रलहून दुपारी 12 वाजता सुटून पहाटे 4.30 वाजता मडगावला पोहचेल.
रेल्वे क्र. 09004 ही परतीची ट्रेन 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी मडगावहून सकाळी 9.15 वाजता निघून दुपारी 1 वाजता मुंबई सेंट्रलला पोहचेल.
थांबे : बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.
रेल्वे क्र. 090119 वांद्रे टर्मिनस-कुडाळ साप्ताहिक स्पेशल (6 फेऱ्या) 25 रेल्वे ऑगस्ट ते 8 सप्टेंबरदरम्यान दर गुरुवारी वांद्रे टर्मिनसहून दु. 2.40 वा. सुटून कुडाळला सायं. 5.40 वा. पोहचेल.
रेल्वे क्र. 09012 ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 26 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान दर शुक्रवारी कुडाळहून सकाळी 6.45 वाजता निघून रा. 9.30 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहचेल.
थांबे : बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधदर्ग (सेकंड क्लास सीटिंग कोच) .
या आहेत गुजरातच्या स्पेशल गाड्या रेल्वे क्र. 09018/17 : उधना-मडगाव साप्ताहिक स्पेशल (6 फेऱ्या) गाड्या
रेल्वे क्र. 09412/511 अहमदाबाद-कुडाळ साप्ताहिक स्पेशल (4 फेऱ्या), रेल्वे क्र. 09150/49 विश्वामित्री-कुडाळ साप्ताहिक स्पेशल (4 फेर्या), रेल्वे क्र. 099001, 09003, 0911, 0918, 09412 व 09150 ची बुकिंग सोमवार, 18 जुलैपासून सुरू होईल. या स्पेशल गाड्यांचे भाडेही स्पेशल ठेवण्यात आले आहे.
या आहेत गुजरातच्या स्पेशल गाड्या
रेल्वे क्र. 09018/17 उधना-मडगाव साप्ताहिक स्पेशल (6 फेऱ्या) ही रेल्वे क्र. 09412/511 अहमदाबाद-कुडाळ साप्ताहिक स्पेशल (4 फेऱ्या), रेल्वे क्र. 09150/49 विश्वामित्री-कुडाळ साप्ताहिक स्पेशल (4 फेर्या), ट्रेन क्र. 099001, 099001, 09003, 09011, 09018, 09412 व 09150 ची बुकिंग सोमवार द 18 जुलैपासून सुरू होईल. या गाड्यांचे भाडेसुद्धा विशेष असेल.