दोन दिवस गरब्याला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, अंतीम निर्णय मुख्यमंत्री घेणार

सायबर सेक्युरिटीसाठी सक्षम व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत.

दोन दिवस गरब्याला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, अंतीम निर्णय मुख्यमंत्री घेणार
पोलिसांच्या 20 हजार जागा भरणारImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 7:52 PM

समीर भिसे, Tv9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी पोलीस भरती करण्यात येणार आहे. गृहविभागाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली. सात-साडेसात हजार जागांसाठीची जाहिरात आधीच निघालेली आहे. आता पुन्हा 12 हजार जागांसाठी भरती निघणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी गृहविभागाच्या बैठकीनंतर दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरबा उत्सव परवानगी 2 दिवस 12 वाजेपर्यंतचं दिली आहे. आणखीन एक दिवस मिळावा, यासाठी आमच्या गृहविभागतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे प्रस्ताव पाठवला जाईल. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

फडणवीस यांनी गृह विभागाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढलं पाहिजे. गेल्या वर्षीत तो कमी झाला होता. तो वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेल विभागामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 1 हजार 641 असे कैदी आहेत ज्यांची बेल झाली आहे.

पण बेल बॉण्ड न भरल्यासाठी त्यांच्याकडे व्यक्ती नाही किंवा पैशे नाहीत. अश्या व्यक्तीसाठी काही कायदेशीर मदत करता येईल ती करणार आहोत. काही एनजीओची सुद्धा मदत घेणार आहोत. जेलमध्ये संख्या जास्त आहे. बेल होऊन सुद्धा एखाद्याला जेलमध्ये राहावे लागते, हे योग्य नाही. आम्ही योग्य निर्णय घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

सायबर सेक्युरिटीसाठी सक्षम व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या जाणार आहेत. सायबर गुन्हे तात्काळ उघडकीस आले पाहिजे. लवकरच या संदर्भात मोहीमसुद्धा राबवली जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न असणार आहोत. जीडीपीच्या साडेतीन टक्के गुंतवणूक कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून राज्यात झाली पाहिजे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.