Raj Thackeray : राज ठाकरे यांनी आज गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना आज त्यांची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी महायुतीला फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याचं म्हटलं आहे. पण यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर फक्त टीका केली असं नाही. चांगल्या कामाचं कौतूक ही केलं आहे. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. चांगल्या भविष्यासाठी हा पाठिंबा देत आहे. मला काही नको, मोदींसाठी फक्त बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, ‘मी काँग्रेसमध्ये जॉईन होणार तेव्हा त्यांना असं वाटलं होतं. मला पक्ष फोडून कुठलीही गोष्ट करायची नाही.स्वतचा पक्ष काढेल पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही. बाळासाहेब यांच्या शिवाय मी कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरी एकाला संधी दिली होती समजलंच नाही.’
‘मी कोणत्याही शिवसेनेचा अध्यक्ष होणार नाही. मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार. मी जागा वाटपाच्या चर्चेसाठी कधीच बसलो नाही. मला ते जमत नाही आणि होणार नाही. चिन्हावर कॉम्परेमाईज नाही.’
‘१९८० ला बाळासाहेब हे दिल्लीला इंदिरा गांधीला भेटायला गेले होते. कोणी भेटायला जात असतात. त्यात मोठेपणा आणि कमीपणा काय आला. मुख्यमंत्री म्हणत होते आपण एकत्र आलं पाहिजे. पण एकत्र आले पाहिजे म्हणजे काय. मी अमित शाहांना फोन केला होता. मग बोलणं झालं.’
‘१९८८ -८९ ला प्रामुख्याने भाजप आणि शिवसेनेची युती झाली होती. शिवसेनेनंतर भाजपसोबत माझे अधिक संबंध आले. गडकरी, मुंडे, महाजन यांच्यासोबतचे संबंध राजकारण पलीकडचे होते. भाजपसोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले. त्यादरम्यान गुजरात दौऱ्यावर गेलो.’
‘मोदी पंतप्रधान व्हावे ही गोष्ट मी आधी बोललो होतो. त्यांच्या पक्षातही हे कोणी बोललं नव्हतं. महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्र आणि मतदारांकडून अपेक्षा आहे. आजच्या परिस्थितीला राज मान्यता देऊ नका. राज्यसभा नको आणि विधानपरिषद ही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीतर माझं तोंड आहेच. जोरात विधानसभेच्या कामाला लागा. मी लवकरच सगळ्यांना भेटायला येईल.’