Video : कल्याण रेल्वे स्टेशनवर भला मोठा साप, प्रवाशांची धावाधाव, पुढे काय झालं तुम्हीच पाहा…
कल्याण स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी भला मोठा साप निदर्शनास आला. | kalyan Railway Station Snake Found
कल्याण : कल्याण स्टेशनवर ऐन गर्दीच्या वेळी भला मोठा साप निदर्शनास आला. यावेळी स्टेशनवरील प्रवाशांची धावाधाव झालेली पाहायला मिळाली. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास एका सापाने कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरील फलाट क्रमांक 1 वर प्रवाशांची दैना केली. (Ghonas Snake Found in kalyan Railway Station)
रेल्वे स्टेशनवरील साप पाहून कल्याण रेल्वे पोलिसांनी सर्पमित्र हितेश करंगावकर आणि दत्ता बोंबे यांना सापाला पकडण्यासाठी पाचारण केले. रात्री साडे 9 च्या सुमारास हे दोघे सर्पमित्र स्टेशनला पोहचले.
जवळपास 5 फुटाच्या घोणस जातीच्या विषारी सापाला पकडण्यासाठी सर्पमित्रांना बरीच कसरत करावी लागली. अखेर या सापाला पकडले गेले. वन अधिकाऱ्यांच्या मदतीने या सापाला सुखरुप सोडण्यातही आलं.
(Ghonas Snake Found in kalyan Railway Station)
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा :
संजय राठोड नॉट रिचेबलच, चर्चगेटच्या घरातील नोकर म्हणतात…
पुणे आणि नागपुरात कोरोना रुग्णसंख्येचा ब्लास्ट, लोकहो काळजी घ्या, नाहीतर…!
Cow Milk Rates | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गाईच्या दूध खरेदी दरात वाढ