गिरगांवात 7 हजार चौरस फूट महारांगोळी, अभिनंदनच्या शौर्याला सलाम

मुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेपूर्वी गिरगावात महारांगोली रेखाटण्यात आली आहे. पाडव्यानिमित्त गिरगावात ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’तर्फे यंदाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.  या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे. मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदाचे श्री. प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने […]

गिरगांवात 7 हजार चौरस फूट महारांगोळी, अभिनंदनच्या शौर्याला सलाम
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई: गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघणाऱ्या शोभायात्रेपूर्वी गिरगावात महारांगोली रेखाटण्यात आली आहे. पाडव्यानिमित्त गिरगावात ‘स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान’तर्फे यंदाही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.  या वर्षीची यात्रा ‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर आधारित आहे.

मागील वर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे. रंगशारदाचे श्री. प्रसाद मुंढे आणि स्वास्थ्यरंगचे डॉ. तेजस लोखंडे यांच्या सहकार्याने ‘ज्योतीने तेजाची आरती’ या यात्रेच्या संकल्पनेवर आधारित 7 हजार चौरस फूटाची महारांगोळी साकारण्यात आली आहे. या महारांगोळीकरिता 200 किलो रांगोळी आणि 600 किलो रंग वापरले आहेत. रंगशारदा आणि स्वास्थ्यरंगच्या 25 कलाकारांतर्फे 7 तासांच्या अथक प्रयत्नांतून ही महारांगोळी साकारण्यात आली.

पुलवामा इथे झालेल्या भ्याड दहशदवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या वायू दलाच्या एअरस्ट्राईकला मानवंदना या रंगोळीमधून देण्यात आली आहे. विंग कमांडर अभिनंदनच्या शौर्याची गाथा रांगोळीच्या माध्यमातून मांडली आहे.

गिरगांवच्या महारांगोळीचे प्रदर्शन शुक्रवार दि. 29 मार्च 2019 आणि शनिवार दि. 30 मार्च, 2019 रोजी सकाळी 9 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत माधवबाग पटांगण, सी. पी. टँक येथे बघता येईल.

महिलांसाठी नऊवारी साडी नेसण्याच्या निःशुल्क प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवार दि. 31 मार्च 2019 रोजी आर्यन शाळा, गिरगांव येथे दुपारी 3 ते 5 या वेळात करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.