मुलगी घरातून रागाने गेली, बाहेर गेल्यानंतर ट्रेनमधून पडून मृत्यू
कल्याण : घरातून रागाने बाहेर पडलेल्या मुलीचा ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यूझाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी परिसरातीलनागेश्वर सोसायटीत राहणारी चेतना पुरुषोत्तम मोरे ही इयत्ता दहावीत शिकणारी तरुणीकाल रागाच्या भरात घरातून निघून गेली. आईच्या पर्समधून चेतनाने 10 रुपये काढलेहोते, याचा जाब आईने विचारला, आईने जाब का विचारला या रागातून चेतना निघून गेली. रात्रीउशिरा […]
कल्याण : घरातून रागाने बाहेर पडलेल्या मुलीचा ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यूझाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. कल्याण पश्चिमेतील फॉरेस्ट कॉलनी परिसरातीलनागेश्वर सोसायटीत राहणारी चेतना पुरुषोत्तम मोरे ही इयत्ता दहावीत शिकणारी तरुणीकाल रागाच्या भरात घरातून निघून गेली. आईच्या पर्समधून चेतनाने 10 रुपये काढलेहोते, याचा जाब आईने विचारला, आईने जाब का विचारला या रागातून चेतना निघून गेली. रात्रीउशिरा घरी परतत असताना रेल्वे गाडीतून पडून तिचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे नागेश्वर सोसायटी परिसरात शोककळा पसरली आहे.
चेतनाला काही कामासाठी पैसे हवे होते. तिने आईच्या पर्समधून 10 रुपये घेतले. हा प्रकार आईला कळताच तिची आई तिच्यावर रागावली. पैसे मला न विचारता का घेतले असा जाब आईने विचारला. या गोष्टीचा राग आल्याने चेतना घरातून बाहेर पडली.
चेतना न सांगता रागाच्या भरात कुठे गेली या गोष्टीने चिंताग्रस्त झालेल्या तिच्या पालकांनी आणि आसपासच्या नागरिकांनी चेतनाचा शोध सुरु केला. चेतना शहाड रेल्वे स्थानकात गेल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी तिच्या पालकांना ती घरातून निघून गेली असल्याची रितसर तक्रार करा असा सल्ला दिला. शहाड स्थानकावरुन चेतना ट्रेनमध्ये बसली. ती मुंबईच्या दिशेने गेल्याचे माहिती मिळाली ठाणे स्थानकात ती सीसीटीव्हीत दिसून आली.
त्यानंतर ठाणे ते दादर आणि मुंबई रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता सीएसएमटी स्थानकात चेतना आढळून आली. सीएसएमटी रेल्वे स्थानकातून तिने घरी परतण्यासाठी गाडी पकडली. हे देखील सीसीटीव्हीत दिसून येत आहे. मात्र त्यानंतर ती कोणत्या स्थानकात उतरली हे दिसून येत नाही. त्यामुळे आणखी चिंताग्रस्त असलेल्या पालकांनी ती दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गर्दीत कुठे तरी गेली असावी असा अंदाज बांधला.
त्या ठिकाणी गर्दीत शोध घेतला असता चेतना दिसून आली नाही. घरी परतत असताना पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडे चेतनाविषयी विचारणा केली असता एक तरुणी चालत्या गाडीतून पडून मृत्यूमुखी पडल्याचे समजलं. तिचा मृतदेह परळ स्थानका दरम्यान मिळून आला. तिचा मृतदेह कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणला गेला. शवविच्छेदन केल्यावर तिचा मृतदेह तिच्या पालकांच्या ताब्यात दिला गेला आहे.
चेतनाने क्षुल्लक गोष्टीवर राग मनात धरला. ती रागाच्या भरात घरातून निघून गेली. घरी परतत असताना चालत्या रेल्वे गाडीतून पडून तिचा मृत्यू झाला ही बाब तिच्या आई-वडिलांच्या मनाला चटका लावून गेली आहे. चेतनाचे वडिलांचे सलूनचं दुकान आहे. चेतनाला लहान भाऊ आहे. चेतनाच्या अशा आकस्मिक निधनामुळे चेतनाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ती राहत असलेल्या परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
क्षुल्लक कारणासाठी पालकांनी मुलांना रागावू नये का? पालकांना तो देखील अधिकार राहिला नाही का? असा सवाल चेतनाच्या आकस्मिक निधनामुळे उपस्थित केला जात आहे.