Gold: लॉकडाऊनमुळे सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका; 800 कोटींचे नुकसान

गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. | Gold silver akshaya tritiya

Gold: लॉकडाऊनमुळे सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका; 800 कोटींचे नुकसान
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 8:53 AM

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा (Gold) शुभमुहूर्त टळला गेला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची (Gold) दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला. (Gold and silver traders incurring heavy losses due to lockdown)

सध्या लॉकडाऊनमुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने किंवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदी शक्य आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीचा दरही वाढत आहे.

गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. त्यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा 49 हजार इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति औंस 1834 डॉलर इतका होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिऔंस 27.20 डॉलर इतका आहे. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, कॉमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) मधील रिकव्हरीमुळे दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 146 रुपयांनी वधारले. भारतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.

सोन्याच्या व्यवहारांसाठी सरकार विशेष धोरण आखण्याच्या तयारीत

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सोन्यासह मौल्यवान धातुंच्या व्यवहारांसाठी एक विशेष धोरण आखण्याची तयारी सुरु आहे. त्यानुसार सोन्यातील गुंतवणुकीचा संपत्तीमध्ये (Asset) समावेश होईल. सध्याच्या नियमांनुसार दागिन्यांचा समावेश ‘undisclosed treasure’ मध्ये केला जातो.

भारतात दरवर्षी 850 टन सोन्याची आयात होते. त्यामुळेच या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या : 

ग्राहकांकडे दोन लाखांपेक्षाही कमी सोने खरेदीवर ओळखपत्राची मागणी, कारण काय?

Akshaya Tritiya 2021 | जाणून घ्या अक्षय्य तृतीयेचं महत्व आणि सोने खरेदीचा शुभ मुहूर्त

Akshaya Tritiya 2021 | आज अक्षय्य तृतीया, जाणून घ्या पूजा विधी, शुभ मुहूर्त, पौराणिक कथा आणि इतर माहिती

(Gold and silver traders incurring heavy losses due to lockdown)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.