मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीसाठी (Dharavi) आनंदाची बातमी आहे. तब्बल 8 महिन्यांनी धारावीने कोरोनापासून (Corona Virus) काहीशी सुटका करुन घेतल्याचं दिसत आहे. मागील 24 तासात धारावीत एकही कोरोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. यावर्षी 1 एप्रिलला धारावीत पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडल्यानंतर आता पहिल्यांदा धारावीत 24 तासात एकही रुग्ण सापडलेला नाही (Good News about Dharavi Corona Update No corona patient in last 24 hours).
धारावी 2.5 चौरसकिलोमीटर भागात वसलेला लोकसंख्येची प्रचंड घनता असलेला भाग आहे. या इतक्याशा जागेवर 6.5 लाखपेक्षा अधिक नागरिक राहतात. या भागात 1 एप्रिलला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत 3 हजार 700 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले. असं असलं तरी सध्या सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या अगदी 10 पेक्षाही कमी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 19 लाख 6 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग (Corona Positive) झालेला आहे. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर 2.57 टक्के आहे. संपूर्ण राज्यात कोविड-19 मुळे आतापर्यंत एकूण 48 हजार 969 नागरिकांचा मृत्यू झालाय.
आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग
महाराष्ट्रात 21 डिसेंबरपर्यंत 15 हजार 877 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा संसर्ग झालाय. याशिवाय एकूण 178 कर्मचाऱ्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालाय. संसर्ग झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 10 हजार 945 कर्मचारी सरकारी आरोग्य विभागात होते, तर 4 हजार 932 आरोग्य कर्मचारी खासगी क्षेत्रात होते.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातील अधिकारी प्रदीप आवटे म्हणाले, “राज्यात एकूण 4 हजार 949 डॉक्टर कोविड -19 मुळे बाधित आहेत. यातील 2 हजार 906 डॉक्टर सरकारी आरोग्य विभागातील आहेत. 2 हजार 43 जण खासगी क्षेत्रातील आहेत.’
हेही वाचा :
Dharavi Corona | मुंबईला आणखी एक प्रशस्तीपत्र, WHO पाठोपाठ आणखी एका बड्या संस्थेकडून कौतुक
जगात पुन्हा मुंबई महापालिकेचा डंका, ‘वॉशिंग्टन पोस्ट’कडून धारावी पॅटर्नसह बीएमसीबद्दल गौरवोद्गार
Good News about Dharavi Corona Update No corona patient in last 24 hours