Mumbai Metro-3 Trial Run: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; मेट्रो 3 ची पहिली ट्रायल रन यशस्वी
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो 3 ची ट्रायल रन (Metro-3 Trial Run) पार पडली. आरेच्या सारीपूत नगरमधील ट्रॅकवर ही ट्रायल रन पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपस्थिती होती.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो 3 ची ट्रायल रन (Metro-3 Trial Run) पार पडली. आरेच्या सारीपूत नगरमधील ट्रॅकवर ही ट्रायल रन पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपस्थिती होती.राजकीय वादामुळे मेट्रो 3 च्या चाचणीला उशीर झाला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे मेट्रो धावल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. तर मेट्रो 3 मुळे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मेट्रो 3 च्या एकूण प्रकल्पाचं 67 टक्के काम पूर्ण झालं आहे. मेट्रो 3 चा पहिला टप्पा हा डिसेंबर 2023 पर्यंत सुरु होण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे कारशेडचे काम लांबणीवर पडल्याने मेट्रो – 3 ची मुदत दोन ते तीन वर्ष पुढे जाण्याचा अंदाज आहे.
ट्रायल रनमध्ये कोणत्या गोष्टीची चाचणी
आज कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो 3 ची ट्रायल रन पार पडली. या चाचणीदरम्यान ट्रेनच्या विविध गोष्टी चेक करण्यात आल्या, ज्यामध्ये मेट्रो ट्रेनच्या ब्रेकची क्षमता, स्वयंचलित दरवाजे व्यवस्थित काम करत आहेत की नाही? एअर कम्प्रेसर आणि इतर टेक्टिकल गोष्टींची यावेळी तपासणी करण्यात आली. तसेच ही ट्रेन प्रवासी वाहतुकीसाठी किती सक्षम आहे याचा अंदाज देखील यावेळी घेण्याता आला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
कुलाबा-वांद्रे -सिप्झ मेट्रो 3 ची ट्रायल रन आज पार पडली या ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार फटकेबाजी केली.राजकीय वादामुळे मेट्रो 3 च्या चाचणीला उशीर झाला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकारामुळे मेट्रो धावल्याचं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला नसता तर पुढील चार वर्षातही ही ट्रेन धावू शकली नसती. वीस हजार कोटीची गुंतवणूक वाया गेली असती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.