मुंबई रेल्वे योजनांसाठी केंद्राकडून 33 हजार कोटी मंजूर
नवी दिल्ली: निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने मुंबईतील परिवहन योजनांसाठी तब्बल 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याद्वारे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प फेज तीन ‘ए’ला (MUTP 3A ) मंजुरी मिळाली. रेल्वे मार्गांचा विस्तार आणि रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने 54 हजार 777 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला […]
नवी दिल्ली: निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकाने मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भरघोस निधी मंजूर केला आहे. केंद्र सरकारने मुंबईतील परिवहन योजनांसाठी तब्बल 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर केले आहेत. याद्वारे मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प फेज तीन ‘ए’ला (MUTP 3A ) मंजुरी मिळाली.
रेल्वे मार्गांचा विस्तार आणि रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाने 54 हजार 777 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला होता. त्यापैकी 33 हजार 690 कोटी रुपये मंजूर झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या अर्थ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतची माहिती दिली. एसी लोकल रेल्वे, रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, उपनगरीय लोकल वाहतूक यासारख्या विविध सेवांवर हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
सरकार ने मुम्बई उपनगरीय रेलवे के इंफ्रास्ट्रक्चर विस्तार हेतु ₹33,690 करोड़ MUTP 3A प्रोजेक्ट के लिए स्वीकृत किये। नई लाइनों, बेहतर सिग्नलिंग सिस्टम, स्टेशन विकास व AC ट्रेन से मुम्बई, उपनगरीय क्षेत्र, ठाणे, पालघर व रायगढ़ को लाभ मिलेगा। #MumbaiKiRaftaar https://t.co/1ajZMDu4QC pic.twitter.com/gCU43nc87J
— Piyush Goyal (@PiyushGoyal) March 7, 2019
मुंबईकरांना काय फायदा? MUTP 3A मध्ये मुंबईसह उपनगरासांठी मोठे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये –
– सीएसएमटी – पनवेल या हार्बर मार्गावर एलिवेटेड कॉरिडोर बनवणे
-पनवेल ते विरार उपनगर कॉरिडोर
-हार्बर लाईन गोरेगावपासून बोरिवलीपर्यंत वाढवणे
– बोरिवली – विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकणे
– कल्याण – आसनगाव दरम्यान चौथी लाईन सुरु करणे
– कल्याण – बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन
– विविध रेल्वे स्थानकांचा विस्तार, अत्याधुनिकरण, तांत्रिक सक्षमीकरण करणे
Govt has approved MUTP-3A. The total estimated cost of the project will be Rs.30,849 crore with completion cost of Rs.33690 crore. The project is likely to be completed in 5 yrs. A look at how it will increase #MumbaiKiRaftaar pic.twitter.com/7cb5TtRWVH
— Western Railway (@WesternRly) March 7, 2019
Good news for Mumbaikars. Central Govt to add more speed to #MumbaiKiRaftaar. Govt. Approves MUTP Phase-3A to increase capacity & segregate long distance & local trains on WR & CR. pic.twitter.com/e3Ny2nliNf
— Western Railway (@WesternRly) March 7, 2019