मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, वॉटर टॅक्सी सेवा सुरू; मुंबईकरांचा वेळ वाचणार
बेलापूर ते फोर्टपर्यंत खासगी टॅक्सीने प्रवास केल्यास ६०० ते ८०० रुपये लागतात. रहदारीच्या वेळी सुमारे दोन तास वेळ लागतो. शिवाय हार्बर मार्गावर वातानुकूलित गाड्या नाहीत. त्यामुळं वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.
मुंबई : आजपासून नवी मुंबईकरांच्या (Mumbai) सेवेत वॉटर टॅक्सी दाखल झाली. बेलापूर (Belapur) ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू झाली आहे. वॉटर टॅक्सीमध्ये (Water Taxi) दोनशे प्रवाशी क्षमता आहे. वॉटर टॅक्सीमुळं ६० मिनिटांत मुंबई ते नवी मुंबई असा प्रवास करता येणार आहे. सकाळी साडेआठ वाजता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया आणि संध्याकाळी साडेसहा वाजता गेट वे ऑफ इंडिया ते नवी मुंबई अशा या दोन फेऱ्या होणार आहेत. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या जलमार्गावर ही जलमार्गसेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. या जलमार्गावर २०० प्रवाशी क्षमतेची हा हायस्पीड बोट आहे. ऐन गर्दीच्या वेळी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया हे अंतर फक्त ६० मिनिटांत पार करता येणार आहे. पण, त्यासाठी ३०० रुपये मोजावे लागतील.
बंदर प्राधिकरण आणि सागरी मंडळाने हा अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सीचा पर्याय समोर आणला. यापूर्वी भाऊचा धक्का ते बेलापूर, बेलापूर ते जेएनपीटी तसेच बेलापूर ते एलिफंटा अशी सेवा फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली. पण, या सेवेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
नोकरदारांना दिलासा
आता बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळं नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, ही सेवा कितपत यशस्वी होते, हे लवकरच कळेल.
प्राप्त माहितीनुसार, वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस धावणार आहे. नोकरदारांना पासची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. वॉटर टॅक्सीचे मासीक पास खरेदी करणाऱ्यांना नियमित भाड्यात २० टक्के सुट दिली जाणार असल्याची माहिती आहे.
अत्याधुनिक वातानुकूलित वॉटर टॅक्सी
विशेषता दक्षिण मुंबईत काम करणाऱ्या नोकरदारांना या वॉटर टॅक्सी सेवेमुळं दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक वातानुकूलित अशी ही वॉटर टॅक्सी सेवा आहे. यामुळं बेलापूर ते गेट वे ऑफ इंडियाला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बंदर विकास मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या वॉटर ट्रक्सी सेवेला प्रारंभ करण्यात आला. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडनं या वॉटर टॅक्सीची सेवा पुरविली आहे. बहुतांश कार्यालयं दक्षिण मुंबईत आहेत. ही वॉटर सेवा दक्षिण मुंबई आणि बेलापूरला जोडणारी आहे.
बेलापूर ते फोर्टपर्यंत खासगी टॅक्सीने प्रवास केल्यास ६०० ते ८०० रुपये लागतात. रहदारीच्या वेळी सुमारे दोन तास वेळ लागतो. शिवाय हार्बर मार्गावर वातानुकूलित गाड्या नाहीत. त्यामुळं वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.