विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला सर्वात मोठा दिलासा मिळालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय शरद पवार गटासाठी फायद्याचा ठरणारय. शरद पवार गटाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून पिपाणी आणि फक्त तुतारी हे चिन्ह गोठवण्यात आलंय. निवडणूक आयोगानं कोणती चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतलाय.
निवडणूक आयोगाकडून फक्त तुतारी आणि पिपाणी हे चिन्ह गोठवण्यात आलंय. तर शरद पवार गटाचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं चिन्ह कायम ठेवण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे फटका बसल्याचा आरोप शरद पवार गटाकडून वारंवार करण्यात आला होता.
पिपाणी चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्यामुळे हे चिन्ह गोठवण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. दरम्यान पिपाणी हे चिन्ह गोठवल्यानंतर शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे अनेक मतदारसंघात शरद पवार गटाला फटका बसला होता. सातारा लोकसभेत शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे होते. चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस ते 32 हजार 771 मतांनी पराभूत झाले. इथं अपक्ष संजय गाडेंचं चिन्ह होतं पिपाणी, 37 हजार 62 मतं मिळाली.
पाहा व्हिडीओ:-
रावेर लोकसभेत श्रीराम पाटील उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस.. ते २ लाख 72 हजारांनी पराभूत झाले इथं अपक्ष होते एकनाथ साळुंखे चिन्ह पिपाणी मतं घेतली 43 हजार 982. नगर लोकसभेत शरद पवार गटाचे निलेश लंकेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस ते 28 हजार 929 मतांनी जिकंले. इथं गोरक्ष आळेकर अपक्ष लढले., चिन्ह होतं पिपाणी आणि 24 हजार 625 मते मिळालीत.
भिवंडी लोकसभेत बाळ्यामामा उमेदवार होते. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस. 66 हजार 121 मतांनी ते विजयी झाले. इथं अपक्ष कांचन वखारे लढल्या., चिन्ह होतं पिपाणी मतं घेतली 24 हजार 625. माढ्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते उभे होते., चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. 1 लाख 20 हजारानं ते जिंकले. त्यांच्याविरोधात अपक्ष रामचंद्र घुटुकडे उभे राहिले., चिन्ह होतं पिपाणी मतं घेतली 58 हजार 421.
बीडमध्ये उमेदवार होते बजरंग सोनवणे चिन्हं होतं तुतारी वाजवणारा माणूस. सोनवणे साडे ६ हजारांच्या फरकानं जिंकले. इथं अशोक थोरात नावाचे अपक्ष उमेदवार पिपाणी चिन्हावर लढले. मतदान घेतलं तब्बल 54 हजार 850. दिंडोरी लोकसभेत शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस. निवडणुकीत शरद पवार गटाच्या भास्कर भगरेंचा १ लाख १३ हजार 199 मतांनी विजय झाला तर भाजपच्या भारती पवारांचा पराभव मात्र, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार बाबू भगरेंना सुद्धा 1 लाख 3 हजार 632 मतं मिळाली त्यांचं चिन्ह होतं पिपाणी.
या सर्व मतदारसंघामध्ये पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांनी चांगली मतं मिळाली. दरम्यान सातऱ्यातील एका जागेवर पिपाणी चिन्हाचा फटका बसल्याचा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. दरम्यान यासंदर्भात शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली होती.. आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला दिलासा देत पिपाणी हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतलाय.