Mumbai Rain Update : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठा पाचपट वाढला, आता किती टक्के पाणीसाठा? वाचा

मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update : मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावातील पाणीसाठा पाचपट वाढला, आता किती टक्के पाणीसाठा? वाचा
Image Credit source: dnaindia.com
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 6:58 PM

मुंबई : गेल्या काही दिवसात मुंबईसह राज्याला मुसळधार (Mumbai Rain Update) पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थितीही (Flood) तयार झाली आहे. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक मोठा दिलासा देणारी माहिती समोर आलीआहे. पाणलोट क्षेत्रातील संततधार आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या 10 दिवसांत मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांच्या एकत्रित पाणीसाठ्यात पाच पटीने (Mumbai Dam Water Supply) वाढ झाली आहे. 5 जुलै रोजी नोंदवलेला पाणीसाठा 14.76 टक्के होता, तो आता 74.82 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबई महानगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या सर्व तलावातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन दिवसात धरणं ओव्हरफ्लो

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर आणि तानसा ही दोन धरणे गुरुवारी ओसंडून वाहू लागली. महानगरपालिका अधिकाऱ्याने सांगितले की गेल्या पंधरवड्यात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, सात पैकी दोन धरणे गेल्या 48 तासांत ओसंडून वाहू लागली आहेत.

कुठून किती पाणीपुरवठा?

36,61,133 दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) साठवण क्षमता असलेले मोडक सागर बुधवारी दुपारपासून ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात झाली, तर 96,894 एमएलडी साठवण क्षमता असलेले तानसा धरण गुरुवारी संध्याकाळपासून ओव्हरफ्लो झाले. या जलाशयांची एकत्रित पाणी साठवण क्षमता 14,47,363 MLD आहे. या ठिकाणांहून शहराला दररोज 3,850 एमएलडी पिण्यायोग्य पाणी पुरवठा केला जातो.

पाणीकपातही मागे घेण्यात आली

या महिन्याच्या सुरुवातीला शहरातील पवई तलाव काठोकाठ भरला, मात्र तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून ते फक्त औद्योगिक कामांसाठी वापरले जाते. बीएमसीने यापूर्वी शहर आणि उपनगरात 10 टक्के पाणीकपात लागू केली होती, परंतु पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने अलीकडेच ती मागे घेतली.

पुढील काही तासही पावसाचे राहण्याची शक्यता

शुक्रवारी शहर आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्याने काही ठिकाणी जोरदार सरी पडल्याने शुक्रवारी दिलासा दिला.हवामानशास्त्र विभागाने पुढील 24 तासांत शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईकरांच्या अनेक समस्यापैकी पाणी ही एक अत्यंत महत्वाची समस्या आहे. धरणात मुबलक पाणीसाठी नसेल तर मुंबईकरांना पाणीकपातीला समोरे जावं लागतं मात्र तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.