कर्जतजवळ मालगाडी घसरली, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा घाटात मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

कर्जतजवळ मालगाडी घसरली, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या रद्द
Follow us
| Updated on: Jul 01, 2019 | 8:02 AM

पुणे : मुंबई पुणे रेल्वे मार्गावर लोणावळा घाटात मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच मध्य रेल्वेकडून अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागतं आहे. दरम्यान पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरु आहे.

मुंबई पुण्यातील कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान सकाळी 4.30 च्या सुमारास मालगाडीचे डब्बे घसरले. यामुळे डाऊन आणि मिडल लाईनवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेस या महत्त्वाच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईहून पुणे मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत.

यामुळे मुंबई-पुणे दरम्यान अधिक बस चालवण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला केली आहे. रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. याबाबतचे सुधारीत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

पुण्याकडे जाणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द

  • सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  • सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस
  • सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (मुंबई-पुण्यादरम्यान रद्द)
  • सीएसएमटी -पुणे डेक्कन एक्सप्रेस
  • भुसावळ – पुणे एक्सप्रेस (नाशिक स्टेशनवर थांबवली)
  • पुणे – भुसावळ एक्सप्रेस
  • पुणे -पनवेल पॅसेंजर
  • पुणे सीएसएमटी डेक्कन क्वीन
  • पुणे सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस

‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

  • सीएसएमटी- बंगळुरु उद्यान एक्सप्रेस
  • कल्याण इगतपुरी मनमाड एक्सप्रेस
  • इंदूर-पुणे एक्सप्रेस
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.