Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण दरेकरांबाबत झालेली ‘ती’ चूक लवकरच दुरुस्त करणार, खासदार गोपाळ शेट्टींची जाहीर कार्यक्रमात कबुली

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत चूक झाल्याची कबुली जाहीर कार्यक्रमात दिली आहे (Gopal Shetty accept mistake about Pravin Darekar).

प्रवीण दरेकरांबाबत झालेली 'ती' चूक लवकरच दुरुस्त करणार, खासदार गोपाळ शेट्टींची जाहीर कार्यक्रमात कबुली
Follow us
| Updated on: Oct 11, 2020 | 5:29 PM

मुंबई : भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत चूक झाल्याची जाहीर कबुली दिली आहे (Gopal Shetty accept mistake about Pravin Darekar). भाजप नेते विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाल्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. “प्रवीण दरेकर यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा उत्तर मुंबईकडून त्यांचा सत्कार झाला नाही. ही या भागाचा खासदार म्हणून माझी चूक आहे,” असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं.

खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, “विनोद तावडे यांच्याबद्दल कुणी काय बोललं आणि माझ्याबद्दल काय बोलतात याकडे मी लक्ष देत नाही. बोरिवलीत चांगलं काम केलं. विनोद तावडे मंत्री झाल्यामुळे बोरिवली मतदारसंघात जास्त येत नव्हते. मात्र, बोरिवलीच्या आयुष्यात एवढा निधी पहिल्यांदाच त्यांच्यामुळे आला. एका नेतृत्वात जे काही गुण असले पाहिजे ते सर्व गुण विनोद तावडेंमध्ये आहेत. या भागाचा खासदार म्हणून मी मान्य करतो की प्रवीण दरेकर यांचा सत्कार करायचा राहून गेला आहे आणि ती माझी चूक आहे हे मी मान्य करतो. पण लवकरच आपण तो सन्मान सोहळा आयोजित करणार आहोत.”

“मी कधीच आपल्या मोठ्या नेतृत्वाकडे प्रॉब्लेम घेऊन जात नाही. तुम्ही मला प्रॉब्लेम सोल्व्ह करायची जबाबदारी दिली आहे. तसेही तुमच्याकडे अनेक लोक प्रॉब्लेम घेऊन येतात म्हणून मी अजून त्यात भर टाकावी. म्हणून मी तुमच्याकडे कधीही प्रॉब्लेम घेऊन येत नाही,” असंही गोपाळ शेट्टी यांनी नमूद केलं.

या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील म्हणाले, “एक स्कीम राष्ट्रीय पातळीवर चालली आहे आणि ती भूमिका बजावण्यासाठी आपण त्यांना पाठवले आहे. जेव्हा त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा आपल्या सर्वांना दुःख वाटलं असेल, पण पक्षाने निर्णय घेतला. विनोद तावडे यांनी तो निर्णय मान्य केला. मला जेव्हा कोथरुडची उमेदवारी मिळाली तेव्हा मला त्या मतदारसंघाच्या सीमा देखील माहिती नव्हत्या. नियतीच्या पोटात काही तरी लिहिलं होतं ते मिळालं.”

संबंधित बातम्या :

मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी मुंबईच्या अमराठी खासदाराचा संसदेत प्रस्ताव

Gopal Shetty Exclusive | मला मंत्रीपद नको, मी खासदार म्हणूनच काम करेन : गोपाळ शेट्टी

संबंधित व्हिडीओ :

Gopal Shetty accept mistake about Pravin Darekar in public program

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.