Gopichand Padalkar : जयंत पाटील, सांगलीचे SP माझ्या हत्येच्या कटात सामील, गोपीचंद पडळकरांचा आरोप

भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला.

Gopichand Padalkar : जयंत पाटील, सांगलीचे SP माझ्या हत्येच्या कटात सामील, गोपीचंद पडळकरांचा आरोप
गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:55 AM

मुंबई: भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी तो व्हिडीओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडीओ आटपाडी पोलीस स्टेशनच्या दारातला असून तिथं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूनं 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचं स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगानं डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचं चित्रीकरण पोलीस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलीस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलीस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

जयंत पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप

गोपीचंद पडळकर यांनी या हल्ल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील पूर्णपणे सामील आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला. कारवाईच्या नावाखाली माझ्या बॉडीगार्डला सस्पेंड केलं आणि माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्यावरचा विश्वास उडाल्यानं बॉडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. रक्षकचं जर भक्षकात सामील झाले असतील तर विश्वास कुणावरती ठेवायचा असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. महाराष्ट्रातील प्रस्थापित पवार आणि पाटलांच्या विरोधातील लढा चालूच ठेवेन, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलीसांचा बॉडीगार्ड नाकारला

तो हल्ला आटपाटी पोलीस स्टेशनच्या दारात झाला आहे. माझी गाडी ज्या दिशेनं येत होती त्याच्या विरोधी बाजूला 200 ते 300 लोक उभे राहिले होते. पोलीस बघत होते, शुटिंग करत होते. मी थांबलो की माझा मर्डर करण्याचा प्लॅन होता, असा धक्कादायक आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत त्यामुळं मी बॉडीगार्ड नाकारल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. हे सर्व  प्रकरण सागंली जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान घडलं होतं. सोलापूरमध्येही हल्ला झाला होता त्यावेळी अमोल मिटकरी यांनी तेच उत्तर दिलं होतं. आता ज्यावेळी हल्ला तो आटपाडी पोलीस स्टेशनसमोरचा होता त्यामुळे यातील सत्य लोकांना माहिती आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत्या. शिवसेना आणि भाजपचे दोन पॅनेल होते. गोपीचंद पडळकर यांचे दोन समर्थक तानाजी पाटील यांच्याकडे गेले. याचा जाब विचारण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर गेले. यावेळी राजू जानकर यांच्या अगांवर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला. चुका आपल्याच असताना आपल्याच समाजाच्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या बदनामीचा प्रयत्न आणि पब्लिसीटी स्टंट असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.

इतर बातम्या:

नाशिकमध्ये प्रशासनाला डुलकी; जमावबंदीतला ‘ज’ सुद्धा पाहायला मिळेना, कोरोना नियमांच्या अमंलबजावणीचा विसर

पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

Gopichand Padalkar released video of attack on him and accused Jayant Patil Sangli Police SP and Additional SP responsible for planning of attack

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.