बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांकडून कोर्टात पहिल्यांदाच बिश्नोई गँगचा उल्लेख

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकर या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी शुभम लोणकर याचा भाऊ आहे. या आरोपीला आज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी पहिल्यांदाच कोर्टात बिश्नोई गँगचा उल्लेख केला.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांकडून कोर्टात पहिल्यांदाच बिश्नोई गँगचा उल्लेख
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 4:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्या प्रकरणी पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे. २८ वर्षीय लोणकरचा पोलीस शोध घेत होते. बाबा सिद्धिकींच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर संशयित शुभम लोणकर याने एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. लॉरेन्स बिष्णोई गँगने ही हत्या केल्याचा दावा त्याने पोस्टमधून केला. त्यानंतर पोलिसांनी लोणकर भावांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर २८ वर्षीय प्रवीण लोणकर याला पुण्यात अटक करण्यात आली. पोलिसांनी प्रवीण लोणकरला आज कोर्टात हजर केलं. यावेळी सरकारी वकिलांनी कोर्टात आज पहिल्यांदाच बिश्नोई गँगचा उल्लेख केला.

आरोपी प्रवीण लोणकर आणि शुभम दोन्ही भाऊ बिश्नोई गँगशी सबंधित असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलं. आरोपी शुभम लोणकर सध्या फरार आहे. त्याच्याविरोधात याआधी आर्म्स एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. शुभम लोणकर कुठे आहे हा त्याचा भाऊच सांगू शकतो, म्हणून त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपी प्रवीण लोणकरला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली.

आरोपी वकिलांचा युक्तिवाद काय?

यावेळी आरोपीच्या वकीलांनी सुद्धा युक्तिवाद केला. “काहीही झालं तरी पोलीस नेहमी शुभम लोणकरच्या भावालाच ताब्यात घेतात आणि चौकशी करतात. या प्रकरणातही प्रवीण लोणकरला घरातून ताब्यात घेतलं. आरोपी प्रवीण लोणकरचा यामध्ये सक्रिय सहभाग नाहीय. तो दुधाची डेअरी चालवणारा सामान्य माणूस आहे. शुभम लोणकर याला अटक करण्याऐवजी प्रवीण लोणकर याला सातत्याने ताब्यात घेण्याची कार्यवाही केली जाते”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी यावेळी केला.

प्रवीण लोणकरला 21 तारखेपर्यंत कोठडी

सरकारी वकिलांनी आरोपीची 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी कमीत कमी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. आरोपी प्रवीण लोणकरला या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने गोवलं जात असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण ऐकून घेतल्यानंतर कोर्टाकडून पोलीस कोठडीबाबत निर्णय जाहीर करण्यात आला. कोर्टाने प्रवीण लोणकर याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.