CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय (CM Uddhav thackeray On Corona) घेतले. 

CORONA : सरकारी कार्यालयांना सुट्टी नाही, लोकल-बस सुरुच राहणार, नाईलाज झाल्यास बंद करु : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Mar 17, 2020 | 6:46 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली (CM Uddhav thackeray On Corona) आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

या बैठकीत राज्यात जी परिस्थिती आहे, त्यावर चर्चा (CM Uddhav thackeray On Corona) झाली. “राज्यात एकूण 40 रुग्ण आहे. त्यात एकाचा आज मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधितांमध्ये 26 पुरुष आणि 14 महिला आहे. त्यात एका रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी पुन्हा आवाहन करतो आहे, आज देखील आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले

“मला खात्री आहे जनतेला या विषयाचं गांभीर्य कळलेलं आहे. जसं पुण्यामध्ये काही लोकांनी स्वत:हून दुकान बंद केली आहेत. मुंबईसह इतर शहरातील दुकानदारांनाही आवाहन करतो आहे की, जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर दुकान चालू ठेवू नये. त्यांनी स्वत:हून ती दुकान बंद केली तर चांगलं होईल,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं

सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी नाही 

“मुंबईमध्ये एक जी बातमी फिरते की, सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी दिली आहे. मात्र अशाप्रकारे सरकारी कार्यालयांना सुट्टी दिलेली नाही. पण उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतो आहोत. 50 टक्के उपस्थिती ठेऊन कामकाज चालू ठेवता येईल का? तोही विचार सुरु आहे. एकूणच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकार म्हणून आवश्यक पाऊलं उचलत आहोत,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“पुढचे 15 ते 20 अत्यंत महत्त्वाची आहेत. या महत्त्वाच्या कालावधीत जनतेनं स्वत:हून स्वयंशिस्त पाळण्याची गरज आहे. सर्वांनी जर सहकार्य तर धोका आपण टाळू शकतो,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

..अन्यथा कठोर निर्णय घेऊ

“आजही आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, जनतेने अनावश्यक प्रवास टाळला नाही तर आम्हाला तसे कठोर निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये,” अशीच माझी इच्छा आहे.

सर्व मंदिर व्यवस्थापकांचे धन्यवाद

“मी सिद्धिविनायक, शिर्डी, जोतिबा मंदिर आणि इतर सगळ्या मंदिर व्यवस्थापकांना धन्यवाद देतो आहे की, त्यांनी स्वत: हून पुढाकार घेऊन पुजा सुरु ठेवून गर्दी कमी करण्यासाठी काही दिवसांसाठी भाविकांसाठी प्रवेशबंदी केली आहे. मी सर्व धर्मियांना आवाहन करतो आहे, त्यामध्ये मंदीर, मस्जिद, दर्गे, चर्चेस, गुरुद्वार आले सर्वधर्मियांचे गुरु आणि धर्मगुरुंनी पुढाकार गेऊन शिस्त पाळावी. संकट परतवल्यानंतर सर्व पूर्वव्रत करु,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोनाचा महिला बळी

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून मुंबईत आलेल्या 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (Maharashtra corona first death) झाला आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पिंपरी चिंचवड – 10
  • पुणे – 7
  • मुंबई – 7
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 3
  • कल्याण – 3
  • नवी मुंबई – 3
  • रायगड – 1
  • ठाणे -1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1
  • एकूण 41

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • मुंबई (3) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • यवतमाळ (1) – 16 मार्च
  • नवी मुंबई (1) – 16 मार्च
  • पिंपरी चिंचवड 1 – 17 मार्च
  • मुंबई 1 – 17 मार्च
  • एकूण – 41 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत कुठे किती मृत्यू?

  • कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
  • दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
  • मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
  • एकूण – 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

CM Uddhav thackeray On Corona

भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.